Slender Loris : सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ 'वनमानव'; घनदाट जंगलात वावर, VIDEO पाहिलात का?

Vanmanav slender loris found in Sindhudurg forest : सिंधुदुर्गच्या जंगलात एक दुर्मिळ वनमानव आढळला आहे. याचा व्हिडिओ सामटीव्हीच्या हाती लागला आहे.
सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ 'वनमानव'
Slender Loris Saam Tv
Published On

विनायक वंजारे, साम टीव्ही

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. जैवविवीधतेने संपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात दुर्मीळ ‘स्लेंडर लॉरिस’ अर्थात वनमानवाचं दर्शन झालंय. वनमानवाचा वावर कायम घनदाट जंगलात असतो. वनमानव हा लाजाळू प्राणी असल्याने त्याला लाजवंती असं देखील म्हणतात. मुळात याला पहिल्यांदा पाहिल्यानंतर माणसाचे लहान बाळ आहे, असाच काहीसा भास होतो. हा प्राणी जंगलात राहत असल्याने वनमानव असं म्हटलं जातं.

सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ 'वनमानव'

सिंधुदुर्गच्या घनदाट जंगलात नुकतेच काही प्राणी अभ्यासक जंगल सफारी करत (Slender Loris) होते. तेव्हा त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये हा वनमानव कैद झालाय. त्यामुळे वनमानवाचा सह्याद्री पट्ट्यातील अधिवास पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. स्लेंडर लॉरीस हा अत्यंत दुर्मिळ प्राणी वन्यप्रेमींना घनदाट जंगलात आढळून आलाय. मात्र आंतरराष्ट्रीय तस्करीची शक्यता असल्यामुळे वनमानवाचं अचूक स्थान गुप्त ठेवलं गेलंय.

घनदाट जंगलात वावर

स्लेंडर लॉरिस हा माकडाच्या प्रजातीमधील एक अत्यंत दुर्मिळ प्राणी असल्याची माहिती अभ्यासकांनी ( Vanmanav Video) दिलीय. श्रीलंका आणि भारत या दोन देशांमध्ये वनमानवाच्या अस्तित्वाचं मूळ आहे. वनमानवाचा वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार 'शेड्यूल वन' मध्ये समावेश करण्यात आलाय. अती पावसाच्या प्रदेशामध्ये वनमानवाचं दर्शन होत असतं. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांच्या आसपासच्या घनदाट जंगलामध्ये वनमानव नजरेस पडला होता.

सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ 'वनमानव'
Animal Fashion Show: वाघ आणि सिंहाने साडी नेसून केला रॅम्पवॉक, जगातील आगळावेगळा फॅशन शो पाहिलात का?

वनमानवाचा व्हिडिओ समोर

वनमानवाची तस्करी देखील केली जात असल्याचं समोर (Sindhudurg forest) आलंय. औषधी वापरासाठी तसंच जादूटोणा करण्यासाठी देखील वनमानवाचा वापर केला जातो. त्यामुळे या प्राण्याची शिकार आणि तस्करी होण्याचा धोका असतो. तामिळनाडूमध्ये वनमानवाची तस्करी आणि शिकार झाल्यामुळे झपाट्याने त्याची प्रजाती कमी (Sindhudurg News) झालीय. आता सिंधुदुर्गमध्ये वनमानवाचा वावर आढळून आल्याने तो एक कौतुकाचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये आपण स्लेंडर लॉरिस हालचाल करत, झाडांच्य मागे पळत असल्याचं पाहू शकतो.

सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ 'वनमानव'
Breeding Center for Animals: राज्यात पानमांजर, गिधाड, रानम्हैससाठी प्रजनन केंद्र; दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर देण्यात येणार भर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com