Parbhani Road Accident: परभणीत मोर्च्यावरून परतणाऱ्या आंदोलकांचा अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला

Parbhani Road Accident: दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे मोर्चासाठी गेलेल्या आंदोलकांच्या टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Parbhani Road Accident
Parbhani Road AccidentSaam tv

Parbhani Road Accident News:

परभणीतून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे मोर्चासाठी गेलेल्या आंदोलकांच्या टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. या अपघातात ४० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे शनिवारी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्च्यात सहभागी होऊन सुकळी येथे परत जात असलेल्या टेम्पोतील आंदोलकांचा लिंबाळा शिवारात अपघात झाला. या अपघातात 40 जण जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

Parbhani Road Accident
Car Accident: १०० फूट खोल दरीत कोसळली कार; चौघांचा मृत्यू, पर्यटनाला जाताना अपघात

अपघात कसा झाला?

छत्रपती संभाजी नगरला शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीवर बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यासाठी सुकळी, ता वसमत येथून मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.

मोर्च्यानंतर वसमत (जिल्हा हिंगोली )परतत असताना सायंकाळी परत निघाले. त्यावेळी रस्त्यात जिंतूरच्या लिंबाळा शिवारात समोरून येत असलेल्या अवजड वाहनाने कट मारला. त्यात टेम्पो चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात 35 महिला 5 पुरुष जखमी झाले.

या अपघातात शांताबाई तुरे, मंदाबाई मगर, सखुबाई मगर, सुमनबई मगर,अरुणा नरवाडे, मोतीराम दवणे, वंदना नरवाडे, संगीता नरवाडे, सरस्वती नरवाडे,पांचल नरवाडे,शोभा नरवाडे, कमलबाई इंगोले, कमलबाई इंगोले, निर्मला खरे,सखुबाई मगर या महिला अपघातात जखमी झाल्या. तर इतर जखमींची नावे अद्याप मिळाली नाहीत.

Parbhani Road Accident
Bhandara Accident: भरधाव कारची दुचाकीला धडक, सुट्टीवर आलेल्या जवानासह तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा

अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच 108 रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी अरुण लाहोटी व चालक महेश कांगणे यांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या ठिकाणी वंचितच्या सपना घनसावध सतीश वाकळे यांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com