Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचं नरेंद्र मोदींवर मोठं वक्तव्य; म्हणाले, 'पंतप्रधानांना तुरुंगात पाठवायचे असेल, तर...'

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे
Prakash Ambedkar And Narendra Modi
Prakash Ambedkar And Narendra Modi Saam Tv
Published On

Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. 'नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवायचं असेल तर आतापासून कामाला लागा. आरएसएस मुख्यालयात एके ४७ यांच्याकडे आली कशी याची चौकशी केली पाहिजे. दुसरीकडे चीनबरोबर १५ दिवसांपूर्वी जे भांडण झालं, त्याची चर्चा पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत होऊ दिली नाही, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar And Narendra Modi
Sharad Pawar : '...तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही'; राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी शरद पवार आक्रमक

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नाशिकमधील धम्म मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'घटनेने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य आता राहणार नाही. आता नवीन कायदा येत आहे. या देशात आंतरधर्मीय आंतरजातीय लग्न होत आहे. समाजाने ते स्वीकारले आहे. विकृती समाजात आहे, त्याला नाकारता येणार नाही. पण याला धरून शासन असताना त्या संबंधित एक कायदा आता गठीत होत आहे'.

नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करताना म्हणाले, ' पंतप्रधान यांच्या तोडीचा माणूसच नाही, दुर्दैवाने आपण सगळे त्याला बळी पडतोय. खरंतर या देशाचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आपला नाही. आपला अधिकार हा खासदार निवडून देण्याचा आहे. खासदार निवडून गेल्यानंतर पंतप्रधान ठरवला जातो, अशी व्यवस्था आहे. हीच व्यवस्था आता बदलायला लावली जात आहे. व्यवस्थेचा भाग म्हणून खासदार निवडण्याचं आपलं काम आहे'.

'आज बिंबवले जात आहे की, पंतप्रधानपदाचा दुसरा उमेदवार नाही. आपल्या मेंदूचा ताबा घेतला जात आहे. आता खासदार निवडू नका, आता पंतप्रधान निवडा. उद्या दुसरा कोणी आला त्याला पंतप्रधान म्हणून निवडणून देणार का? या देशात उतरंडीची व्यवस्था आहे. तोपर्यंत निम्न जातीतील लोकांना मत दिली जाणार नाहीत. त्यामुळे तुमची पंतप्रधान होण्याची संधी कायमची संधी गेली. पाटलाला मत देतील, असे आंबेडकर पुढे म्हणाले.

Prakash Ambedkar And Narendra Modi
MVA Morcha: 'मोर्चा फक्त शिवसेनेचा, कॉंग्रेस - राष्ट्रवादी नावाला...' प्रकाश आंबेडकरांची टिका

खासदाराला निवडण्याचा अधिकार काढून घेतला जात आहे. तुम्हाला बंदिस्त करण्याचं काम केलं जात आहे. आरएसएस उगाच म्हणत नाही की, संधी दिली तर संविधान बदलणार. कुठल्याही पक्षाचा प्रमुख ईडीच्या चौकशी खाली आहे. राहुल गांधी यांना पाठीमागे उभं राहायला लावलं. मागे नाही राहिला तर तुरुंगात पाठवेल. त्यामुळे त्यांना उभं राहावंच लागलं, असेही आंबेडकर म्हणाले.

'नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे चोर आहेत. २०२४ ला सत्ता बदल्यास सगळ्यात मोठे आरोपी मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी राहतील. नोटा रद्द केल्याची केस चालू झाली आहे. कोर्टाने सांगितले की, पंतप्रधानांपेक्षा जास्त आम्हाला अधिकार नाही. नोटा काढण्याचा अधिकार पंतप्रधान यांचा की रिझर्व्ह बँकेचा? एखादी नोट खराब झाली तर कोण बदलतं ? रिझर्व्ह बँक बदलते, असे प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com