MVA Morcha: 'मोर्चा फक्त शिवसेनेचा, कॉंग्रेस - राष्ट्रवादी नावाला...' प्रकाश आंबेडकरांची टिका

या मोर्चामधून शिवसेना आपले शक्तीप्रदर्शन करत आहे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSaam Tv
Published On

महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला मुंबईमध्ये जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच डाव्या पक्षांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मोर्चात सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीच्या महामोर्चाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, "महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेला मोर्चा फक्त शिवसेनेचा असून राष्ट्रवादी, कॉंग्रेस नावाला आहे. या मोर्चामधून शिवसेना आपले शक्तीप्रदर्शन करत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या प्रवेशाला राष्ट्रवादीचा विरोध आहे," असेही ते म्हणाले. (Mahavikas Aghadi)

Prakash Ambedkar
Beed News: ग्रामपंचायत निवडणुकीचा थरार; सत्तेसाठी चक्क मामावर तलवारीने केला हल्ला

सीमाभागाच्या वादावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सीमावाद प्रकरणात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच दोशी असल्याची टिका केली. त्याचबरोबर "राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष असून त्यांना गरीब मराठेही चालत नाहीत," असेही ते यावेळी म्हणाले. भाजपच्या राजकारणावरही प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टिका केली.

याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "भाजपाचा सामाजिक आणि राजकीय लढ्यात समावेश नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आदर्श व्यक्तिमत्वांच्या कर्तृत्वावर काळे फासण्याचा प्रयत्न केला जात आहे." भाजपामुळेच देशात गलिच्छ राजकारण सुरू असून सध्या भाजपाविरोधात फक्त मीच जास्त बोलतो असेही ते यावेळी म्हणाले.

Prakash Ambedkar
MVA Morcha : 'हा तर तीन पक्षांचा नॅनो मोर्चा...' देवेंद्र फडणवीसांनी उडवली 'महामोर्चा'ची खिल्ली

त्याचबरोबर "मी चाळीस वर्ष राजकारणात आहे मात्र डाग नाही, बाकी सगळे डागाळलेले आहेत असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी जाता जाता खोक्याच्या संस्कृतीतून आरएसएसने संस्था उभे केल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल त्यांनी वेळ दिल्यास आम्ही त्यांचा सत्कार करु," असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या महामोर्चात उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, नाना पाटोले यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com