MVA Morcha : 'हा तर तीन पक्षांचा नॅनो मोर्चा...' देवेंद्र फडणवीसांनी उडवली 'महामोर्चा'ची खिल्ली

मोर्चावर प्रतिक्रिया देताना तीन पक्ष मिळून एवढीचं गर्दी जमवली असून हा तर नॅनो मोर्चा आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSAAM TV
Published On

Mumbai : सत्ताधाऱ्यांकडून वारंवार महापुरूषांचा होणारा अपमान, वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात शनिवार (१६, डिसेंबर) ला महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चावर प्रतिक्रिया देताना तीन पक्ष मिळून एवढीचं गर्दी जमवली असून हा तर नॅनो मोर्चा आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाना पटोले असे मोठे नेते सहभागी झाले होते.  (Mahavikas Aghadi

Devendra Fadnavis News
MVA Morcha :'तुम्ही फेब्रूवारी महिना बघणार नाही..' महामोर्चात संजय राऊत कडाडले; केंद्र सरकारवरही केली सडकून टिका

राज्यभरातून लाखो कार्यकर्ते येणार असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या मोर्चाला नॅनो मोर्चा म्हणत खिल्ली उडवली आहे. आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी "रोज बाबासाहेबांचा, संतांचा अपमान करणारेच मोर्चे काढत आहेत. ज्यांना बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला माहित नाही त्यांना मोर्चा काढण्याचा काहीही अधिकार नाही," असे म्हणत सावरकरांचा अपमान होताना तुम्ही कोठे होता असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंना केला.

त्याचबरोबर "तीन पक्ष मिळून फक्त एवढीच गर्दी जमवली, आणि गर्दी कमी असल्यामुळेच ड्रोन शॉट घेतला जात नाही असे म्हणत हा तर तीन पक्षांनी मिळून काढलेला नॅनो मोर्चा होता," अशा शब्दात या मोर्चाची फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे.

Devendra Fadnavis News
MVA Mahamorcha: शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महापुरुषांचा अपमान, राज्यपालांना हटवलं पाहिजे; महामोर्चातून अजित पवार कडाडले

"राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सुरक्षित असून ते शेवटपर्यंत टिकणार आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आमचचं सरकार निवडून येणार" असल्याचा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान महाविकास आघाडीच्या या महामोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी आपल्या भाषणातून राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com