MVA Morcha :'तुम्ही फेब्रूवारी महिना बघणार नाही..' महामोर्चात संजय राऊत कडाडले; केंद्र सरकारवरही केली सडकून टिका

या सभेला संबोधताना संजय राऊत यांनी राज्य तसेच केंद्र सरकारवर सडकून टिका केली आहे.
Sanjay Raut Slams CM Eknath Shinde & Bhagat Singh Koshyari
Sanjay Raut Slams CM Eknath Shinde & Bhagat Singh KoshyariSaam TV
Published On

Sanjay Raut News : सत्ताधाऱ्यांकडून वारंवार महापुरूषांचा होणारा अपमान, वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात शनिवार (१६, डिसेंबर) ला महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाला सुरूवात झाली असून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या भाषणातून शिंदे फडणवीस सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. (Sanjay Raut Latest News)

Sanjay Raut Slams CM Eknath Shinde & Bhagat Singh Koshyari
MVA Mahamorcha : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला मोठी गर्दी, 'या' पक्षांचाही पाठिंबा

राज्यभरातून आलेले लाखो कार्यकर्ते, आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित मुंबईत महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सूरूवात झाली आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोलेंसह अनेक दिग्गज नेते या महामोर्चात सहभागी झाले आहेत. या सभेला संबोधताना संजय राऊत यांनी राज्य तसेच केंद्र सरकारवर सडकून टिका केली आहे. (Tajya News)

काय म्हणाले संजय राऊत ?

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या भाषणात राज्यपालांवर थेट हल्ला चढवला. "हा महामोर्चा महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आहे, राज्यपाल भगतसिंग कोशारीला डिसमिस करण्यासाठी आयोजित केला असून राज्य सरकारला तुम्ही फेब्रूवारी महिना बघणार नाही," असा कडकडीत इशाराही दिला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की "सर्वत्र या सरकारविरोधात नाराजी असून जनता सरकार उलथून टाकण्याची संधी शोधत आहेत. आजचे हे आंदोलन गावागावात उभे राहणार आहे. एकीकडे भगवा तिरंगा असे सगळेच रंग एकत्रित झाला असून महाराष्ट्राचा रंग एक झाला आहे. या आंदोलनाने सरकारविरूद्ध रणशिंग फुंकले आहे."

Sanjay Raut Slams CM Eknath Shinde & Bhagat Singh Koshyari
MVA Morcha : मोर्चाला सुरूवात होण्याआधीच कार्यकर्ते पोलिसांमध्ये बाचाबाची, पाहा नेमकं काय घडलं?

आपल्या भाषणात संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवताना "तो कर्नाटकचा मुख्यमंत्री बोम्मई रोज महाराष्ट्राची बदनामी करतो. तिकडे चिनशी लढण्याची भाषा करतात पण महाराष्ट्रात आमच्या महापुरूषांचा अपमान होतो. हे सगळ थांबवण्यासाठी आणि आम्ही सगळे एक आहोत हे दाखवणारा हा मोर्चा आहे, "असा इशारा दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com