
दिलीप कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी
फेब्रुवारी महिना सुरु होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रेमाचा आठवडा सेलिब्रेट केला जातो. यावेळी व्हॅलेंटाईल डेच्या दिवशी गुलाबाची फुले दिली जातात. या दिवशी गुलाबाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात बाजारात गुलाबाची फुले जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु आता गुलाबाच्या फुलांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मावळमध्ये बदलत्या वातावरणामुळे गुलाबावर परिणाम होत आहे.
मावळ तालुक्यात कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण असा गेल्या महिन्याभरापासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे गुलाब शेतीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी फुल उत्पादकांचा औषध फवारणी सह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आता खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे थंडी अभावी फुलांचे उत्पादन लवकर येण्याची शक्यता असल्याने व्हॅलेंटाईन डे साठीच्या उत्पादनाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता फुल उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.
देशात बंगळुरु पाठोपाठ पुणे व नाशिक जिल्ह्यात गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जाते. अनुकूल हवामानामुळे मावळात मोठ्या प्रमाणावरती गुलाब फुलत असतो. 14 फेब्रुवारीला जगभरात साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे हा फुल उत्पादकांसाठी वर्षभरातील सुगीचा हंगाम असतो. परदेशात मोठे मागणी असल्याने या काळात गुलाब फुलांची निर्यातही मोठ्या प्रमाणावर केली जाते. व्हॅलेंटाईन डे साठी 26 जानेवारी पासूनच फुले परदेशात पाठवण्यास सुरुवात करतात. त्यानंतरच्या पंधरा दिवसात या व्यवसायात मोठी उलाढाल होते.
दरम्यान व्हॅलेंटाईन डे चा हंगाम साधण्यासाठी 50 ते 55 दिवस अगोदरच उत्पादनाचे नियोजन करावे लागते. मात्र यावर्षी बदलत्या हवामानामुळे फुल शेतीवर परिणाम झाल्याचा पाहायला मिळत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात या फुल उत्पादनावरती परिणाम होऊ नये यासाठी फुल उत्पादकांकडून औषध फवारणी केली जात आहे. मात्र बाजार भावापेक्षा उत्पादनाच्या आणि फुलांच्या काळजी वरती मोठा खर्च होत असल्याचा फुल उत्पादकांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे येणारा व्हॅलेन्टाईन्स डे हा शेतकऱ्यांसाठी हॅप्पी असणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.