Siddhi Hande
प्रत्येक देशाचे जसे वेगवेगळे राष्ट्रीय फुल असतात. तसेच राज्याचेदेखील असतात.
महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते हे तुम्हाला माहितीये का?
महाराष्ट्राचे राज्य फुल गुलाब किंवा कमळ नाही आहे.
महाराष्ट्राचे राज्य फुल ताम्हण आहे.
ताम्हण हे फूल पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात आणि विदर्भात असते. मुंबईतदेखील अनेक ठिकाणी ताम्हण फुलाची झाडे दिसतात.
हे फूल साधारणपणे महाराष्ट्र राज्य दिवस म्हणजे १ मेच्या काळात येत असल्याने त्याला राज्यपुष्प म्हणून संबोधले जाते.
ताम्हण हे फूल लालसर- जांभळ्या रंगाचे असते. या फुलाला कोकणा मोठा बोंडारा असेदेखील म्हणतात.
महाराष्ट्र सरकारने १९९० मध्ये ताम्हण फुलाला राज्य फुलाचा दर्जा दिला आहे.