Sharad Pawar : पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप, शरद पवारांना मोठा धक्का, शिलेदारांनी साथ सोडली

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सत्यजित पाटणकर आणि वैभव पाटील या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला असून, शेकडो कार्यकर्तेही त्यांच्या सोबत गेले आहेत.
Sharad Pawar NCP
SHARAD PAWAR SHOCKED: NCP LEADERS DEFECT TO BJP IN WESTERN MAHARASHTRA
Published On

NCP Anniversary Sharad Pawar News : पुण्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिवस साजरा होत आहे. जल्लोषाचे वातावरण असतानाच पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. महत्त्वाच्या शिलेदारांनी साथ सोडली आहे. सत्यजित पाटणकर आणि वैभव पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी साथ सोडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पवारांना पश्चिम महाराष्ट्रात मोठा हादरा बसल्याचे बोलले जातेय.

सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का

सांगलीच्या विटयाचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवानेते वैभव पाटील यांचा भाजपात दाखल होणार आहेत. मुंबईमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वैभव पाटील आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

वैभव पाटील हे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक देखील लढवली होती.मात्र निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडून आता वैभव पाटील भाजपात दाखल होणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Sharad Pawar NCP
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पैलवान चंद्रहार पाटील धनुष्यबाण हाती घेणार

सातऱ्यात मोठा धक्का -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्याचे प्रमुख नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी आज (10 जून 2025) सकाळी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश केला. भाजपा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन असताना भाजपाने हा राजकीय डाव खेळला. 26 मे 2025 रोजी पाटणमध्ये झालेल्या बैठकीत पाटणकर यांनी भाजपात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात आणला. पाटणकर यांच्या पक्षप्रवेशामुळे पाटणच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याची चर्चा आहे. यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar NCP
Maharashtra Politics: सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय; मंत्री नितेश राणेंचा शिंदेगटाला गंभीर इशारा|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com