Markadwadi : मी दोन दिवसात राजीनामा देतोय, शरद पवारांच्या आमदाराचे मोठं वक्तव्य

uttamrao jankar : शरद पवार यांनी मारकडवाडीला भेट दिली. यावेळी उत्तम जानकर यांनी लोकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजीमाना द्यायला तयार असल्याचं स्पष्ट केले.
Sharad Pawar
शरद पवार - साम टिव्ही
Published On

uttamrao jankar : राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर मी राजीनामा देणार आहे. ⁠माझी पोटनिवडणूक घ्यावी अशी माझी विनंती आहे, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर म्हणाले. मारकडवाडी येथ आज शरद पवार भेट देण्यासाठी आले. ईव्हीएमवर संशय घेत बॅलेट पेपरवर मतदान घ्या, या मागणीसीठी माळशिरसमधील गाव सरसावले होते. त्यासंदर्भात शरद पवार यांनी मारकडवाडीला भेट दिली. यावेळी उत्तम जानकर यांनी लोकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजीमाना द्यायला तयार असल्याचं स्पष्ट केले.

मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाहीतील हुकुमशाहीच्या थोबाडीत मारली आहे. ⁠फक्त मारकडवाडीच नाही तर माळशिरस च्या मतमोजणी विरोधात संपुष्टात तालुक्यात आक्रोश आहे. ⁠बॅलेट पेपरवरील मतमोजणीसाठी सर्व उमेदवारांना आमंत्रित केले होते. पण इतर उमेदवार आले नाहीत. ⁠बॅलेटवरील मतमोजणी होऊ नये, यासाठी सीआरपीएफच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. ⁠⁠मी खरोखरचा राजीनामा देतोय. पण हे कोणालाच मान्य नाही, असे उत्तम जानकर म्हणाले.

उत्तम जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याबाबत मारकडवाडी येथे असणाऱ्या लोकांना विचारले. मी खरोखरचा राजीनामा देतोय. पण हे कोणालाच मान्य नाही. जानकर यांनी लोकांना विचारले हातवर करुन सांगा , हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही ॲफीडेव्हीट करणार का? ⁠तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींचा ठराव करुन देणार आहे. या निवडणुकीच्या विरोधात, अशी माहिती मिळाली आहे.

लोकशाही वाचवायची असेल तर, ती शरद पवारच वाचवू शकतात. ⁠सगळ्यांनी हात वर करून सांगा मी राजीनामा देऊ का? राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर मी राजीनामा देणार आहे. ⁠राहुल गांधी यांचे लोक मारकडवाडीत येऊन गेले. ⁠अनेक निवृत्त जज येथे येणार आहेत. ⁠सामाजिक कार्यकर्ते येणार आहेत. ⁠देशात अनागोंदी येईल, अशीच परिस्थिती राहीली तर ⁠गुरुवारच्या माळशिरसच्या बाजारात मोदींना आणलं होतं, लोकसभेच्या निवडणुकीत. तरीही भाजपच्या उमेदवाराला ६४ हजार मतदान झाले होते. आणि विधानसभेला १ लाख ८ हजार कसे झाले, असा सवाल उत्तम जानकर यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com