Pandharpur : वाळू चोरीसाठी चक्क घोड्यांचा वापर, पंढरपूर प्रशासनाची डोळेझाक

चंद्रभागा वाळवंटातील वाळू चोरी थांबविण्यासाठी महाराज मंडळींनी यापूर्वी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. वाळू चोरीमुळे बंधा-याला धोका निर्माण झाला आहे.
uses of horse in sand theft case near pandharpur
uses of horse in sand theft case near pandharpur saam tv
Published On

Pandharpur News :

पंढरपुरातील वाळू चोरांनी जलदगतीने वाळू वाहतूक करण्यासाठी अफलातून शक्कल लढवली आहे. यासाठी चक्क घोड्यांचा वापर केला जात आहे. वाळू चोरीसाठी टमटम, होडी, ट्रॅक्टर, बैलगाडी या सारख्या साधनांचा वापर केल्याचे आपण पाहिले आहे. यापुढे जावू आता वाळू चोरांनी चक्क घोड्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. लग्न कार्याच्या निमित्ताने नवरदेवाला मिरवणा-या घोड्यांना रात्री वाळू वाहतुकीसाठी जुंपले जात असल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला आहे.‌ (Maharashtra News)

सध्या पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध वाळू उपशाचा प्रश्न चर्चेत आला आहे. दोन दिवसा पूर्वी चिंचोली भोसे गावात वाळू उपसा करताना एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता चक्क वाळू चोरीसाठी घोड्यांचा वापर केला‌ जात असल्याचे दिसून आले आहे.

uses of horse in sand theft case near pandharpur
Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर प्रशासनचा मोठा निर्णय, 'या' दिवशी भाविकांना पहाटे १ वाजल्यापासून मिळणार दर्शन

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जात आहे. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठं मोठे खड्डे पडले आहेत. अशातच आता शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधार्या जवळून वाळू चोरी सुरू आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाळू चोरीमुळे बंधा-याला धोका निर्माण झाला आहे. चंद्रभागा वाळवंटातील वाळू चोरी थांबविण्यासाठी महाराज मंडळींनी यापूर्वी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. परंतु कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

अशातच आता जलदगतीने वाळू वाहतूक करण्यासाठी चोरांनी चक्क घोड्यांचा वापर करत वाळू चोरीच्या व्यवसायात नवी शक्कल लढवली आहे. अशा घोड्यांवर व त्यांच्या मालकांवर पोलिस काय कारवाई करतात हे पाहावे लागेल.

Edited By : Siddharth Latkar

uses of horse in sand theft case near pandharpur
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोमवारपासून मिळणार हॉल तिकीट; जाणून घ्या सूचना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com