
राज्यातील अनेक जिल्ह्यांना सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. अनेक भागात विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला आहे. नाशिकजिल्ह्यात तर ऐन पावसाळ्यात जेवढा पाऊस झाला नव्हता तेवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. शेतीचे मात्र अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पिकं भूईसपाट झाली आहेत. ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारली त्यामुळे पिके करपून गेली, आता कुठे उन्हाळी पिके फूलली होती. मात्र अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भूईसपाट झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हलालदिल झाला आहे.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील बेजगाव,मोहदरी या डोंगरपट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे.पावसळ्यात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा अवकाळी पाऊस बरसला आहे. त्यामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
श्रीरामपूर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर अहमदनगर जिल्ह्यात काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. मात्र द्राक्ष बागायतदारांना अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा, कांदा इत्यादी पिकांनाही फटका बसणार आहे. शहरातील अनेक भागात वीज पुरवठा केला खंडित करण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. सकाळपासून वातावरण ढगाळ होते. त्यामुले पावसाची शक्यता होती. त्यानंतर खामगाव , नांदुरा , मोताळा तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. दरम्यान काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.