Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024 Saam Digital

Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रातील ४८ जागांवर मविआचं एकमत झालंय का? संजय राऊत यांनी स्पष्टचं सांगितलं

Lok Sabha Elections 2024 Update : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंबंधी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी आघाडीतल सर्वच पक्षांच एकमत झालं आहे. कोण कुठे लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
Published on

Lok Sabha Elections 2024

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंबंधी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी आघाडीतल सर्वच पक्षांच एकमत झालं आहे. कोण कुठे लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे जागावाटपावर उद्याची शेवटची बैठक असून त्यानंतर बैठक होणार नाही, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

लोकसभेच्या जागा वाटपावर आमचं एकमत आहे. वंचित बरोबर सातत्याने चर्चा सुरू आहे. उद्या एक बैठक आमच्या सगळ्यांची होईल, पुन्हा बैठक होणार नाहीत. पृथ्वीराज चव्हाण आज आले त्यामुळे अधिक चालना मिळेल.आज वंचितची बैठक होणार आहे उद्या पुन्हा ते बैठकीला हजर राहतील जागा वाटप बाबात सर्व नेते एकत्र येऊन जागा वाटपाचा मसुदा जाहीर करतील,उद्याची शेवटची बैठक असेल, त्यानंतर तुम्हाला इथे येण्याची तसदी घ्यावी लागणार नाही, असं राऊत म्हणाले.

वंचितची सभा झाल्यावर त्यांच्या कार्यकारिणीची बैठक आहे. बैठकीत चर्चा करतील नंतर बैठकीला उपस्थित राहतील. जेव्हा प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार असतील तेव्हा जागा वाटपाचा मसुदा घोषित करतील. उद्या जागावाटप संदर्भात शेवटची बैठक असेल पण उद्या जागावाटपाचा मसुदा घोषित केला जाणार नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

Lok Sabha Elections 2024
Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे विरोधात दलित, मराठा बांधव आक्रमक; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं जागा वाटपावर एकमत झालं आहे. आज आमची चर्चा अंतिम टप्यात आली आहे. आमचा प्रस्ताव वंचितला दिला आहे उद्या त्यांचा प्रस्ताव येईल ४८ जागांबाबत महाविकास आघाडीचा विजय होईल. कारण शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार आहेत. लोकांचा सरकारवरच विश्वास राहीला नाही. महाविकास आघाडीवर लोकांचा विश्वास आहे तसा सर्वे आल्याचं सांगितलं.

Lok Sabha Elections 2024
Manoj Jarange Patil : मोठी बातमी! अंतरवालीतील मंडप हटवण्याचे आदेश, पोलीस दाखल झाल्यानंतर जरांगें संतापले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com