बीडमध्ये एटीएम फोडण्याचा अनोखा पॅटर्न; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ब्लॅक स्प्रे मारत एटीएम फोडण्याचा प्रयत्न

बीडच्या केज शहरातील खळबळजनक घटना
Beed Police
Beed Policeविनोद जिरे
Published On

बीड - जिल्ह्यात चोरट्यांकडून चोरी करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात तर आता पहिल्यांदाच बीडमध्ये (Beed) एटीएम फोडण्यासाठी अनोखा पॅटर्न सुरू करण्यात आले आहे. चोरांकडून चक्क शटर फोडल्यानंतर आत मध्ये प्रवेश करून सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरावर ब्लॅक स्प्रे मारत एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या केज शहरांमध्ये उघडकीस आले आहे.

हे देखील पहा -

आज पहाटे 3:51 वाजण्याच्या दरम्यान, केज शहरातील कानडी माळी रस्त्यावर असलेल्या, महाराष्ट्र बँकेच्या एटीएम चे लोखंडी शटर दोन चोरट्यांनी उघडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी एटीएममध्ये गेलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी, आपल्या सोबत आणलेला ब्लॅक स्प्रे एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारला. त्यानंतर चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.

Beed Police
आफ्रिकन महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून आणले 10 कोटींचे ड्रग, डॉक्टरांनी बाहेर काढल्या 60 कॅप्सूल!

दरम्यान पोलीस प्रशासनाला खुले आव्हान देणारा चोरट्यांचा हा पराक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल होत, पहाणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यात चोऱ्या आणि लुटमारीचे प्रकार होत आहेत. चोरट्यांकडून पोलीस प्रशासनाला एक प्रकारचं खुलं आव्हान दिलं जातंय. मात्र यावर आळा बसण्यास पोलिस प्रशासन पूर्णतः अयशस्वी झाल्याचं चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झालंय. यामुळे चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com