Ulhasnagar News : उल्हासनगरातील फटाका दुकानांना दुर्घटनेची भीती, अग्निशमन दलही वेळेत पोहोचणार नाही; काय आहे कारण?

Ulhasnagar news : उल्हासनगर शहरात ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी कपड्याची बाजारपेठ असून ही सगळी दुकानं गजानन मार्केट परिसरात आहेत
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv
Published On

उल्हासनगर : मुरबाड येथे फटाका कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर उल्हासनगर शहरातील गजबजलेल्या गजानन मार्केट परिसरातील फटाका दुकानांमुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याठिकाणी आगीसारखी घटना घडल्यास वित्तहानी सोबतच मोठी जीवितहानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं महापालिकेकडून परवाना देताना या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे.

उल्हासनगर (Ulhasnagar News) शहरात ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी कपड्याची बाजारपेठ असून ही सगळी दुकानं गजानन मार्केट परिसरात आहेत. सणासुदीच्या दिवसात या भागात अक्षरशः चालायलाही जागा नसते. त्यामुळं पोलीस या भागातले रस्ते वाहनांसाठी बंद करतात. मात्र याच चौकात फटाक्यांची मोठमोठे दुकाने आहेत. गजबजलेल्या या परिसरात फटाका दुकानांमध्ये दुर्घटना घडल्यास कोणत्याही प्रकरणी उपाययोजना उपलब्ध नाही. दुकानांमध्ये अग्निरोधक यंत्रणा असली, तरी ती फक्त नियमांची पूर्तता करण्यापुरतीच आहे. दरम्यान, फटाका असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश थारवानी यांनी मात्र दुकानं ३० वर्षांपासून असून अद्याप दुर्घटना घडलेली नसल्याचं सांगत अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जात असल्याचं स्पष्ट केलं. 

Ulhasnagar News
Ulhasnagar News : मुलांमधील भांडणावरून तलवार घेऊन पोहोचले घरासमोर; पाच जणांवर गुन्हा दाखल

अग्निशमन दलाची गाडी पोहोचणेही कठीण 
गजबजलेल्या परिसरात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास (Fire Brigade) अग्निशमन दलाची गाडी देखील ट्रॅफिक आणि गर्दीमुळे वेळेत येऊ शकणार नाही. परिणामी या भागात वित्तहानी सोबतच जीवितहानी देखील होईल. त्यामुळं या परिसरातल्या फटाका दुकानांना परवानगी देताना दरवर्षी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यावरच महापालिकेला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com