Ulhasnagar News : मुलांमधील भांडणावरून तलवार घेऊन पोहोचले घरासमोर; पाच जणांवर गुन्हा दाखल

Ulhasnagar News : उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणजित सिंग ठाकूर आणि सुनीता पवार यांच्या मुलांमध्ये किरकोळ वाद आहे
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv
Published On

उल्हासनगर : उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तलवार घेऊन चाळीत दहशत माजविण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरु होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी तलवार घेऊन फिरणाऱ्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर (Ulhasnagar) पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणजित सिंग ठाकूर आणि सुनीता पवार यांच्या मुलांमध्ये किरकोळ वाद आहे. याच वादातून रणजित सिंग ठाकूर आणि त्याच्या साथीदारांनी हातात तलवार, रॉड आणि लाकडी दांडके घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करत बाहेर जाण्यास टाळलं. परंतु आरोपींनी सुनीता पवार यांच्या घराबाहेर येऊन त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

Ulhasnagar News
Navi Mumbai : भारतीय रेल्वेत नोकरीचे आमिष; १ कोटी ३१ हजार घेत बांधले आलिशान घर

सदरचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. घडल्या प्रकरणानंतर उल्हासनगर पोलीस (Police) ठाण्यात रणजित सिंग ठाकूर आणि त्याच्या पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com