रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

Uddhav Thackeray Hindutva comeback analysis: ठाकरेसेनेनं रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून राममंदिरातील दान चोरीचा मुद्दा उचलून धरलाय... मात्र याचं आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा बदललेला पहेराव आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिका अधोरेखित झालीय...त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे... पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...
Uddhav Thackeray and Aaditya Thackeray in saffron attire during the Ramraksha movement in Nagpur, highlighting a renewed Hindutva stance.
Uddhav Thackeray and Aaditya Thackeray in saffron attire during the Ramraksha movement in Nagpur, highlighting a renewed Hindutva stance.saam tv
Published On

उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा एकदा हिंदुत्वाचा वाट धरली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो कारण अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणाविरोधात ठाकरेसेनेनं सुरू केलेलं रामरक्षा आंदोलन... या आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी मुंबईनंतर थेट फडणवीसांच्या नागपूरात रामरक्षा आंदोलन केलं...आम्हाला रामाचं रक्षण करता येतं असं ठणकावणाऱ्या ठाकरेंच्या पहेरावातूनही त्यांची भूमिका ठसठशीतपणे समोर येतेय..नागपूरमध्ये भगवा कुर्ता घातलेल्या उध्दव ठाकरेंसोबत भगवी टोपी घालून आदित्य ठाकरेही उपस्थित होते

जाहीर सभा असो महत्त्वाचे दौरे असो धार्मिक विधी किंवा शिवसेनेचा वर्धापन दिन... उद्धव ठाकरे हातात शिवबंधनाऐवजी रुद्राक्षाची माळ आणि भगवा कुर्ता घालून व्यासपीठावर येताना दिसतात..

22 जानेवारी 2024

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना, उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये भगवा कुर्ता आणि गळ्यात- हातात रुद्राक्ष घालून महाआरती केली

19 नोव्हेंबर 2024

ठाकरे कुटुंबीय तुळजाभवानीच्या दर्शनाला गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती. तर रश्मी ठाकरे भगव्या साडीत दर्शनाला पोहचल्या...

19 जून 2026

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भगवा कुर्ता घालून शिवसेनेच्या वर्धापन दिनासाठी पोहचले. उद्धव ठाकरेंनी तर बाळासाहेबांप्रमाणेच रुद्राक्षाची माळ घातली होती

नागपूरमधील रामरक्षा आंदोलनात भगवा कुर्ता आणि टोपी घालण्यामागील कारणचं ठाकरेंनी उघड करत भाजपवर निशाणा साधलाय...

दरम्यान हिंदूत्व सोडल्याची टीका करणाऱ्या भाजपवरही

ठाकरेंनी हल्लाबोल केलाय... काँग्रेसचे नेते रामरक्षा आंदोलनाला येतात, त्यामुळे हिंदूत्व कुणी सोडलं आणि कुणी धरलं? हे तुम्हीच सांगा, असं म्हणत ठाकरेंनी आपण हिंदूत्व सोडलं नसल्याचं अधोरेखित केलयं... खरंतर, उद्धव ठाकरेंनी 2019 साली भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवी युती केली. तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाजपसह स्वपक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र आता स्वत: ठाकरेंनीच हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेऊन आणि आपल्या कृतीतून हिंदूत्वाचे पुरस्कर्ते असल्याचं दाखवून दिलयं... त्यामुळे राजकारणात यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यापुढेही हिंदुत्वाची कास धरून वाटचाल करणार हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com