Maharashtra Politics: मुंबई महापालिका कोण जिंकणार? निवडणुकीआधीच ठाकरेंनी घातलं गाऱ्हाणं

BJP vs Thackeray Sena: मुंबई महापालिकेवरून राजकारण चांगलचं तापलयं... सत्ताधारी भाजप आणि ठाकरेसेना वारंवार एकमेंकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करतायत... अशातच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई महापालिका निवडणुकीआधी देवाला गाऱ्हाणं घातलयं..ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray offering prayers during the Malvani Festival, seeking divine blessings for Mumbai’s upcoming BMC elections.
Uddhav Thackeray offering prayers during the Malvani Festival, seeking divine blessings for Mumbai’s upcoming BMC elections.Saam Tv
Published On

राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात.. ठाकरेसेनेनं मुंबई महापालिकेसाठी रणशिंग फुंकलयं...उद्धव ठाकरेंनी मागाठाण्यातील मालवणी महोत्सवात थेट देवाकडे गाऱ्हाण घातलयं....2012 च्या महोत्सवात गाऱ्हाणं घातलं होतं तेव्हा सुनील प्रभू महापौर झाल्याची आठवणही त्यांनी करुन दिलीय....

दरम्यान सुनील प्रभूंनीही जुन्या आठवणींना उजाळा देत.. महापौर पदासाठी घेतलेल्या गाऱ्हाण्याबद्दल सांगितलयं...मात्र या गाऱ्हाण्य़ावरून भाजपनं ठाकरेसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय...निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे देवाला विसरतात.., अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीय.

सत्याचा मोर्चानंतर ठाकरेसेनेनं मुंबई महापालिका जिंकण्यासाठी चांगलीच कंबर कसलीय.. सेना भवनवर ठाकरेंनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पालिकेसाठी रणनिती आखण्याची तयारी सुरु केलीय.. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरेसेना असं चित्र पाहायला मिळणार आहे.. त्यात उद्धव ठाकरेंनी देवाकडे गाऱ्हाणं घालून थेट सत्ताधाऱ्यांनाच आव्हानं दिलयं... त्यामुळे महापालिका निवडणुकीत जनता कोणाला कौल देते...मुंबईचा पुढचा महापौर कोण बनतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com