Marathi Bhasha Vijay Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Uddhav Thackeray Big Message: वरळी डोममध्ये मराठी विजयी सोहळा पार पडला. ठाकरे बंधू एकत्र दिसले. उद्धव ठाकरेंनी ‘एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी’ असं म्हणत राजकीय युतीचे स्पष्ट संकेत दिले.
Uddhav Thackeray Big Message
Uddhav Thackeray Big MessageSaam TV news
Published On

आज मुंबईच्या वरळी डोममध्ये ‘मराठी विजयी सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडत आहे. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर हा सोहळा मराठी अस्मितेचा विजय म्हणून साजरा करण्यात येत आहे. या ऐतिहासिक दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्यानंतर व्यासपीठावर उभे राहून उद्धव ठाकरेंनी उपस्थित जनतेला थेट संबोधित केलं. या भाषणादरम्यान त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं; 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी' या वक्तव्यातून उद्धव ठाकरेंनी युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भाषणानंतर व्यासपीठावर उभे राहून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी, 'आम्ही एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी', आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला, असे विधान उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरूवातीला केलं. 'आम्ही हिंदूत्व सोडलंय अशी टीका केली जात होती. पण आम्ही मराठी बोलणारे हिंदू आहोत. आमच्याएवढा धर्माभिमानी, कडवट हिंदू दुसरा कुणी नाही. १९९२ च्या दंगलीत आम्ही हा कडवटपणा दाखवून दिला',असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Big Message
Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

हिंदी मानणार नाही - ठाकरे

यावेळी, आम्ही हिंदी मानणार नाही, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. 'भाजपकडून एक विधान एक प्रधान, असं सांगितलं जायचं.. नंतर वन नेशन, वन इलेक्शन ही थीम काढली..आता त्यांच्याकडून हिंदी, हिंदू, हिंदूस्तान, अशी घोषणा दिली. या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहे. पण हिंदी आम्ही मानणार नाही' असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील एका सभेत 'जय गुजरात' अशी घोषणा केली होती. 'काल एक गद्दार बोलला. जय गुजरात.. किती लाचारी..' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

तसेच 'संकट आल्यानंतर मराठी माणूस एकत्र येतो. पण संकट गेल्यानंतर मराठी माणूस एकमेकांशी भांडतो.. आता नतद्रष्टपणा आपण करायचा नाही', असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Big Message
Marathi Bhasha Vijay Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com