Maharashtra politics : ठाकरेंकडून शेलारांचं कौतुक; म्हणाले मोदी-शहांना खोटं ठरवत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं

Uddhav Thackeray on Ashish Shelar : उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर आणि आशिष शेलार यांच्या वक्तव्यावरून जोरदार हल्लाबोल केला. मतदार यादीत घोळ, बोगस मतदार, कर्जमाफी व शेतकरी प्रश्नांवर ठाकरे यांचा सरकारला टोला. फडणवीसांना “पप्पू” संबोधत मोदी-शहांनाही लक्ष्य.
Uddhav Thackeray news
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Uddhav Thackeray calls cm Fadnavis Pappu statement : मतचोरीवरून पुन्हा एकदा ठाकरेंनी भाजप अन् आयोगावर निशाणा साधला. त्याशिवाय कर्जमाफीवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.

आशिष शेलार यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे सिद्ध केलेय. त्यांची उठबस त्या लोकांमध्ये आहे त्यामुळे त्यांना ती लोकं सापडली. आम्ही या लोकांमध्ये जास्त असतो म्हणून आम्हाला ही लोकं मिळाली. पण आशिष शेलार यांचं कौतुक करतो की त्यांनी हिम्मत केली. शेलार यांनी अमित शहा, मोदींपासून देवेंद्र फडणवीस यांना खोटं ठरवलं. आशिष शेलार यांचं काय बिनसलं आहे माहीत नाही पण त्याचं कौतुक करतो. देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवलं, असा टोला ठाकरेंनी सत्ताधारी आणि आशिष शेलार यांना लगावला.

ठाकरेंचा पुन्हा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ ('मत'चोरी') आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने अर्ज करण्याचा प्रयत्न केला, ओटीपी आला असता तर माझ्या कुटुंबातील नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असती,' असा खळबळजनक गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला आहे. निवडणूक आयोगाचे 'सक्षम' ॲप खासगी कंपन्या हाताळत असल्याचा संशय ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत तपासावे यासाठी शिवसेनेच्या शाखांमधून मतदार ओळख केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर, सरकारने आपल्या कार्यकाळात सुरू केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा तात्काळ जाहीर करावा आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ५ तारखेपासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Uddhav Thackeray news
Pune : पुरंदरमध्ये जमिनी विकत आहात? त्याआधी वाचा PMRD चा कडक इशारा , नेमकं काय आहे प्रकरण?

फडणवीसांवर जहरी टीका, काय म्हणाले ठाकरे?

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, कर्जमुक्ती, पीक विमा आणि अतिवृष्टीच्या नुकसानीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. 'आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जून मध्ये केली तर तो फायदा होणार नाही, हे कोणतं कसं काय गणित?,' असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर उपस्थित करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणारे केंद्रीय पथक केवळ दोन-तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार, यावरही ठाकरेंनी शंका व्यक्त केली.

Uddhav Thackeray news
CIDCO Homes : दोन लाखांनी घरे स्वस्त होणार, निवडणुकीआधी सरकार घेणार मोठा निर्णय? सिडकोची आज महत्त्वाची बैठक

ठाकरेंनी सोडला टीकेचा बाण, सरकारला धारेवर धरलं

शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी केवळ दोन रुपये मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, ही सरकारची थट्टा आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणारे केंद्रीय पथक केवळ दोन-तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार, यावरही शंका आहे. मला वाटत नाही राज्याकडून कर्जमाफीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला असेल. पुढील वर्षी जूनमध्ये कर्जमाफी करण्याच्या आश्वासनामुळे, तोपर्यंत कर्जाचे हप्ते कसे भरायचे आणि रब्बी हंगामासाठी नवीन कर्ज कसे मिळणार, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत, असे ठाकरे म्हणाले.

कर्जमाफी पुढच्या वर्षी करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता कर्ज माफी केली तर बँकांचा फायदा होईल असं मुख्यमंत्री अतर्क्य वाक्य म्हणाले. आता कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल अन् पुढच्या वर्षी जून महिन्यात केल्यावर बँकांना कसा फायदा होणार नाही. हे कसं शक्य आहे, त्यांनाच माहिती. कारण त्यांना वाटतं की ते चांगले अर्थतज्ज्ञ आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्‍यांना टोला लगावला.

Uddhav Thackeray news
Local Body Election : वारे फिरणार! राज्यात ७२ तासांत आचारसंहिता लागणार? ३ टप्प्यात निवडणुका होणार

मतचोरी करणारे नक्षलवादी, ठाकरेंचा भाजपवर हल्ला

उद्धव ठाकरे यांनी बोगस मतदार, आशिष शेलार आणि अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'जे मतचोरी करून निवडणूक लढतायत आणि जिंकायचा प्रयत्न करतायत ते नक्षलवादी आहेत,' असा थेट हल्लाबोल ठाकरेंनी केला. भाजप नेते आशिष शेलार यांनीच मतदार यादीतील चुकांची माहिती दिल्याचे म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले.

ठाकरे म्हणाले, 'मी आशिष शेलार यांचे अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाविरोधात बोलण्याची हिंमत दाखवली, कारण त्यांचा सगळा कारभार चोरीचा आहे, मतं चोरून त्यांनी सरकार बनवलं आहे.' त्यांनी आणि राज ठाकरे यांनी बोगस मतदार आढळल्यास त्यांना चोप देण्याचे विधान केल्याचे मान्य केले. घसीटाराम हलवाई नावाच्या अस्तित्वात नसलेल्या दुकानाच्या पत्त्यावर ४८ मतदार नोंदवल्याचा धक्कादायक प्रकारही त्यांनी उघड केला. याशिवाय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवार आणि सरकारवर 'गलिच्छ आणि पडलेले सरकार' अशी जळजळीत टीका केली. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचा शेतकऱ्यांना किती लाभ झाला, हे पाहण्यासाठी आपण स्वतः पाहणी दौरा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Uddhav Thackeray news
Accident : खडीने भरलेल्या ट्रकची प्रवासी बसला जोरात धडक, २० जणांचा जागेवरच मृत्यू, अनेकजण जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com