साकीनाक्यातील क्रूरकर्त्यास देहदंडाची शिक्षा द्या : उदयनराजे

udayanraje bhosale
udayanraje bhosale
Published On

सातारा : मुंबईतील साकीनाक्यातील खैरानी रोड khairani road येथे नुकतेच एका महिलेवर बलात्कार झाला. तिच्यावर अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेतील संशयित आराेपीस देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी भावना खासदार उदयनराजे भाेसले udayanraje bhosale यांनी व्यक्त केली आहे.

खासदार उदयनराजे भाेसले म्हणतात देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या साकीनाका परिसरातील घडलेल्या घटनेत क्रुरता-विकृती-वासनेला बळी पडलेल्या महिलेची जगण्याची झुंज नुकतीच अयशस्वी ठरली. काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. या घटनेचा दुःख, खेदही वाटतोच परंतु त्याही पेक्षा मनस्वी संताप येतो. राज्यातील आणि देशातील स्त्री असुरक्षित असेल तर आपण विकासाच्या गप्पा कोणत्या धारणेवर करतो हा प्रश्न पडला आहे.

स्त्री दाक्षिण्य मानणा-या माणसाच्या हवसवृत्तीने टोक गाठले आहे. या व अश्या बलात्कारांच्या घटनेला सरकार जबाबदार आहेच परंतु सर्व समाज आणि मानवजात जबाबदार आहे. कायदा आंधळा आहे. परंतु तो नेहमीच न्यायिक निवाडा करतो. खरंतर अशा प्रवृत्तींना जरब बसेल अशा प्रकारच्या शिक्षांची तरतुद आयपीसी-१८६० मध्ये करावी लागेल असेही उदयनराजेंनी नमूद केले आहे.

udayanraje bhosale
Monday Motivation : दिव्यांग रवी झाडावरील नारळ काढून चालविताे घर

राज्याने बलात्काराच्या बाबतीत कायदेतज्ञांशी विचारविमर्श करुन, वेगळी दंड निती, संहिता अस्तित्वात आणावा. या घटनेची शहानिशा तातडीने करुन क्रूरकर्त्याला देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी भावना उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com