Monday Motivation : दिव्यांग रवी झाडावरील नारळ काढून चालविताे घर

Ravi Koli
Ravi Koli
Published On

सांगली : हात पाय नसलेली दिव्यांगला मदतीची गरज भासते. देवाला दोष देत दुसऱ्यांच्या वर निरभर राहिलेले खूप उदाहरणे रोज पाहायला मिळतात पण सांगलीच्या वड्डी गावातील दिव्यांगाने यावर मात केली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तो कोणतेही साधन न वापरता केवळ पाच मिनिटात नारळाच्या उंच झाडावर चढून नारळ काढतो. हाताचा पंजा नसलेला आणि जणू घोरपडीची पकड असलेला या अवलियाचे नाव आहे रवी काेळी Ravi Koli.           

मिरज तालुक्यातील वड्डी येथे रवी विठोबा कोळी हा राहतो. गावात वीस वर्षांपूर्वी शेतात काम करत असताना पाखरं हाकलून लावण्यासाठी लावलेला स्फोटक रवीच्या हातात उडाले. या अपघात त्याचा डाव्या हाताचा पंजा काढावा लागला. मग जगायचं कस हा प्रश्न त्याच्यापुढं निर्माण झाला. उपजिविकेचे साधन शोधत असताना झाडावर चढता येते का याचा प्रयत्न त्याने केला. त्यावेळी त्याला समजले की आपण हाताचा पंजा नसताना ही झाडावर चढू शकतो. मग त्याने यालाच व्यवसाय म्हणून स्वीकार केला.

सुमारे 40 ते 50 फूट उंच नारळाच्या झाडावर चढून मोजून पाच मिनिटांत नारळ काढण्याची कला रवी कोळीने अवगत केली आहे. विशेष म्हणजे तेही कोणत्याही साधनांचा वापर न करता. रवी एका हातात खुरपे घेऊन घोरपडी सारखे नारळाच्या झाडावर सरसर चढतो. रोज जीव धोक्यात घालून आपला आणि आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह तो करत आहे. एका नारळाच्या झाडावरून नारळ काढण्यासाठी फक्त पन्नास रुपये मजुरी मिळते पण त्यात तो समाधानी आहे. एवढ्यावर कुटुंबातील गरजा भागत नसल्याने तो इतर वेळी गवड्यांच्या हाताखाली कामाला ही जातो.

Ravi Koli
साता-यात 'या' मार्गावर वन वे; पार्किंग व्यवस्थेतही बदल

हात पाय सुदृढ शरीर असून ही काही लोक नशिबाला आणि देवाला दोष देत आपला निष्क्रियपणा लपवून जगत आहेत. मात्र दिव्यांग झाल्यानंतर ही न डगमगता रोज जीव धोक्यात घालून उपजिविका करणारा रवी कोळी हा अवलिया समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याच काम करत आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com