Udayanraje Bhosale : शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल काय मोठे आहेत का? उदयनराजे भोसले कडाडले

Udayanraje Bhosale on Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल काय मोठे आहेत का? राज्यपालांच्या निवासस्थानाची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकासाठी द्या', अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
Udayanraje Bhosale demands a memorial of Shivaji Maharaj at the Governor residence
Udayanraje Bhosale demands a memorial of Shivaji Maharaj at the Governor residenceSaam TV News
Published On

ओंकार कदम, साम टीव्ही

सातारा : 'राज्यपालांच्या निवासस्थानासाठी ४८ एकर जागा कशाला ठेवली आहे. शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल काय मोठे आहेत का? राज्यपालांच्या निवासस्थानाची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकासाठी द्या', अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. 'यासारखी अरबी समुद्राच्या बाजूला जागा कुठेही मिळू शकणार नाही. याबाबतची मागणी राज्य आणि केंद्राकडे केली असल्याचं', खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

'शिवस्मारक आणि महापुरुषांचा अवमान होऊ नये यासाठी कायदा याआधीच काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात व्हायला हवा होता. शिवसेनेच्या नावातच शिवाजी महाराजांचा शिव आहे पण त्यांनीही काही केलं नाही. उठसूट कोणी पण महापुरुषांबदल बोलणाऱ्यांबद्दल देखील काही झालं नाही. पण आता ते होत आहे, ते काम माझ्याकडून होत आहे, हे माझ्या आयुष्यातील मोठं काम आहे. असं देखील उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

Udayanraje Bhosale demands a memorial of Shivaji Maharaj at the Governor residence
Nitesh Rane : प्रकाश आंबेडकर सावध व्हा ! ज्या जागा तुम्ही जिंकू शकत नाही, मविआ तुम्हांला देत आहे : नितेश राणे

आज पत्रकार परिषदेला खासदार उदयनराजे निळा रंगाचा शर्ट घालून आले होते याबाबत त्यांना विचारलं असता, 'निळा रंग हा माझा आवडीचा रंग असल्याचं त्यांनी सांगितलं. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी महिलांची पहिली शाळा सुरू केली. त्यांचे अनुकरण महात्मा फुले यांनी केलं. या वक्तव्याबाबत खासदार उदयनराजे यांनी मी या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली आणि ती लिहित असताना कोणावर अन्याय होऊ नये अशी लिहिली. अभिमान वाटतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झालं. खऱ्या अर्थाने संपूर्ण जगात वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटना पाहिल्या आणि आपली पाहिली तर त्यात जमीन आस्मानचा फरक आहे. एवढे बारकावे कोणत्याच राज्यघटनेत नाहीत', असं देखील राजेंनी म्हटलं आहे.

Udayanraje Bhosale demands a memorial of Shivaji Maharaj at the Governor residence
Devendra Fadnavis: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती- देवेंद्र फडणवीस

'राज्यघटना लिहित असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही हे खरंच त्यांनी आपल्याला दिलेली देण आहे. या देशाचं नशीब छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्यांनी ज्यांनी समाज घडवण्याचं काम केलं त्यात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरून चालणार नाही. संविधान कोणीच बदलू शकत नाही, आणि ज्या दिवशी संविधान बदललं जाईल (असं होणारच नाही) त्या दिवशी देशाच्या अखंडतेला तडा जाईल', असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

Udayanraje Bhosale demands a memorial of Shivaji Maharaj at the Governor residence
Gold Price: अरे बापरे! सोनं आणखी महागणार? प्रति तोळ्यासाठी १ लाख ३६ हजार मोजावे लागणार; आजचा भाव किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com