Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 2 तरुणांनी स्वत:ला संपवलं; मन सुन्न करणाऱ्या घटनांनी मराठवाडा हळहळला

Maratha Youths Ended Life : मराठा आरक्षणाची मागणी करत हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे.
Maratha Youths Ended Life
Maratha Youths Ended LifeSaam TV
Published On

सगेसोयरे आणि हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या जरांगेंच्या उपोषणाचा आज सोमवारी सातवा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असून सरकारने अद्यापही कोणतीही मागणी मान्य केलेली नाही. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. दुसरीकडे नैराश्यातून काही तरुण टोकाचं पाऊल उचलत आहेत.

Maratha Youths Ended Life
Maratha Reservation: आमचा भाऊ अन्नपाण्याविना तडफडतोय, आम्हाला घास कसा जाईल; मराठा भगिणी ढसाढसा रडल्या, पाहा VIDEO

अगदी काल परवाच धाराशीव येथील एका मराठा शेतकऱ्याने आरक्षणाची मागणी करत आपलं जीवन संपवलं होतं. ही घटना ताजी असतानाच मराठवाड्यात आणखी दोन तरुणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे.

साईनाथ सखाराम पडोळे (वय २६) आणि दादाराव रंगनाथ काकडे (वय ४०) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ हा हिंगोलीतील वसमत तालुक्यातील मुडी येथील रहिवासी होता. सोमवारी पहाटे अडीज वाजेच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी साईनाथने एक चिठ्ठी लिहून ठेवली. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आमरण उपोषण करत आहेत. परंतु सरकार दुर्लक्ष करत आहेत. म्हणून मी आत्महत्या करत आहे. या घटनेला सरकार जबाबदार आहेत, असा उल्लेख साईनाथने चिठ्ठीत केला. त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे.

जालना जिल्ह्यातील वरुडी येथील दादाराव रंगनाथ काकडे (वय ४०) यांनी देखील आपल्या राहत्या घरी रविवारी रात्री विष प्राण करून आत्महत्या केली. आपल्या राहत्या घरात रविवारी (ता. २३) रात्री उशिरा विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे. सरकार आरक्षणावर काही निर्णय घेत नाहीये. त्यामुळे मुलांच्या भवितव्यामुळे मी नैराश्यात गेलो असून आत्महत्या करीत असल्याचं दादाराव यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलंय.

दरम्यान, दादाराव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. मात्र, जोपर्यंत शासन आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह गावात घेऊन जाणार नाही, अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली. मराठा आरक्षणासाठी दोन तरुणांनी आपलं जीवन संपवल्याने मराठवाड्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

Maratha Youths Ended Life
Maratha vs OBC : तुझ्या बापाचं राज्य आहे का? लक्ष्मण हाके कुणावर भडकले? पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com