Accident : सावंतवाडीमध्ये २ एसटी बस समोरासमोर धडकल्या, कॉलेजसमोर भीषण अपघाताचा थरार

Sawantwadi Accident : सावंतवाडी आजगाव येथे दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या. २५ प्रवासी जखमी. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
Sawantwadi ST Bus Accident
Sawantwadi ST Bus AccidentSaam TV News Marathi
Published On

विनायक वंजारी, साम टीव्ही प्रतिनिधी

Sawantwadi ST Bus Accident : सावंतवाडीमध्ये २ एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये २५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आजगावमध्ये डीएड कॉलेजसमोरच एसटी बसचा अपघात झाल्यामुळे एकच गोंधळ अन् गर्दी झाली होती. स्थानिकांनी तात्काळ एसटीमधील प्रवाशांना बाहेर काढत उपचारासाठी दाखल केले. काही जणांना गंभीर इजा झाल्याची माहिती मिळाली आहे. एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Sawantwadi Malewadi Shiroda road ST bus collision near college)

सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड - शिरोडा रस्त्यावर आजगाव येथे दोन एसटी बसमध्ये अपघात झाला. वेंगुर्लेवरून पणजीकडे जाणारी बस आणि सावंतवाडीवरून शिरोडाकडे जाणारी बस यांचा समोरासमोर अपघात झाला. दोन्ही बसचे दर्शनी भागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये बसमधील प्रवासी, वाहक, चालकाला ग्रामस्थानी मदत करून बसमधून बाहेर काढले. यात जखमी झालेल्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.

Sawantwadi ST Bus Accident
Latur Band : छावाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याची बेदम मारहाण, राज्यात पडसाद, आज लातूर बंद

सावंतवाडी आजगाव येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन पंचवीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना डीएड कॉलेज समोर सावंतवाडी-शिरोडा महामार्गावर घडली. जखमींना अधिक उपचारासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अमित प्रभू, सचिन प्रभू, संतोष रेवांडकर, अशोक रेवांडकर, गणेश रेवांडकर, आनंद कळसुलकर, शुभम पर्व, सूर्य पांढरे, सुनील आजगावकर यांसह ग्रामस्थांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी पाऊस असतानाही स्थानिकांनी जखमींना रिक्षा तसेच मिळेल त्या वाहनातून उपचारासाठी मळेवाड आरोग्य केंद्रात आणि शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

Sawantwadi ST Bus Accident
Mumbai : ऑटोमध्ये पिटबुलने मुलाच्या मानेचे लचके तोडले, वाचवण्याऐवजी मालक खिदळत राहिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com