

मध्य प्रदेशात बेशिस्तीवरून मोठी कारवाई
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दोन पोलीस कर्मचारी निलंबित
कारवाईने पोलीस दलात खळबळ
मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये बेशिस्तीवरून पोलीस दलात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइन व्हिडिओ आढावा बैठकीत पान खाणे आणि विनाकारण हसण्यावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बालाघाटचे पोलीस अधीक्षक आदित्य मिश्रा यांनी दोन सहायक उपनिरीक्षकांना निलंबित केलं आहे. रामकिशोर रहांगडाले आणि पेंडारीलाल अहाके असे दोन्ही अधिकाऱ्यांची नावे आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय पातळीवर चौकशी सुरू आहे.
आदेशानुसार, सहायक उपनिरीक्षक रामकिशोर रहांगडाले हे आढावा बैठकीदरम्यान विनाकारण हसत होते. त्यांनी प्रलंबित तक्रारींबद्दल समाधानकारक उत्तर देखील दिले नाही. तर बैठकीदरम्यान पेंडारीलाल पान खात होते. त्यांना सोपवलेल्या कामाचं अपडेट त्यांच्याजवळ नव्हतं.
रिपोर्टनुसार, पोलीस अधिकारी आदित्य मिश्रा यांनी म्हटलं की, दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा मुद्दा केवळ बेशिस्तीचा नाही. तर संवेदनशीलता नसल्याचा आहे. व्हिडिओ कॉन्फेरन्सदरम्यान बेपत्ता मुलांच्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी सहायक उपनिरीक्षक हे इतर कर्मचाऱ्यासोबत हसत होते. त्यावेळी त्यांच्याजवळ केसची डायरी देखील नव्हती. त्यांच्याकडे सोपवलेल्या कामाची संपूर्ण माहिती नव्हती. अशीच स्थिती दुसर्या अधिकाऱ्याची देखील होती.
तत्पूर्वी, बालाघाट पोलिसांनी बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी अभियान सुरू केलं आहे. पोलिसांनी मागील १५ दिवसांत २० मुलांचा यशस्वी शोध घेतला आहे. यातील एका लहान मुलाला नेपाळमधून भारतात आणलं. परंतु या प्रकरणात निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांकडून आणखी काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.