लातुरात OBC आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलन; दोन आमदार ताब्यात

राज्यभर OBC आरक्षण रद्द झाल्याने आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद लातुरात देखील उमटले आहेत. आंदोलनातील दोन आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लातुरात OBC आरक्षणासाठी भाजपचं चक्का जाम आंदोलन; दोन आमदार ताब्यात
लातुरात OBC आरक्षणासाठी भाजपचं चक्का जाम आंदोलन; दोन आमदार ताब्यातदीपक क्षीरसागर

लातूर : राज्यभर OBC आरक्षण रद्द झाल्याने आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद लातुरात Latur देखील उमटले आहेत. आमदार रमेशप्पा कराड Rameshappa Karad व आमदार संभाजी पाटील निलंगेकर Sambhaji Patil Nilangekar यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. यामुळे आंदोलनातील दोन आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Two MLAs arrested in BJPs Chakka Jam agitation for OBC reservation in Latur

या महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकारच्या काळात मराठा आरक्षण घालवला आहे. याचं पाप झाकण्यासाठी OBC च राजकीय व पदोन्नतीच आरक्षण या सरकारच्या काळात देखील हातून गेलं आहे. या महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक खात्यात सचिन वाझे Sachin Vaze आहेत. हे केवळ वसुली सरकार आहे. असा आरोप आमदार रमेशप्पा कराड यांनी केला आहे.

हे देखील पहा-

यावेळी OBC च्या 42 संघटना सहभागी झाल्या होत्या. OBC आरक्षण रद्द झाल्याने भाजपचा BJP व OBC समाजाच्या विविध संघटनानी आंदोलन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आरक्षण कामाच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचं, वसुली सरकारचा धिक्कार असो अश्या विविध घोषणानी परिसर दणाणून गेला होता. Two MLAs arrested in BJP's Chakka Jam agitation for OBC reservation in Latur

लातुरात OBC आरक्षणासाठी भाजपचं चक्का जाम आंदोलन; दोन आमदार ताब्यात
अनिश्चिततेत आशेचा किरण- भाग १

2 तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या आंदोलना दरम्यान आमदार रमेशप्पा कराड व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह किमान 200 आंदोलकांना शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आंदोलकांवर कारवाई करून सोडून देण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com