अत्यंत दुर्दैवी घटना, कूलरचा शॉक लागून दोन चिमुकलींचा मृत्यू
Akola NewsSaam Tv

Akola News: अत्यंत दुर्दैवी घटना, कूलरचा शॉक लागून दोन चिमुकलींचा मृत्यू

Akot News: अकोल्यात कूलरचा शॉक लागून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी

अकोल्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे कूलरचा शॉक लागून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 4 वर्षीय ईशानी प्रवीण ढोले आणि 5 वर्षीय प्रियांशी सोपान मेतकर, असं कुलरचा शॉक लागून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातल्या काळेगाव गावात ही घटना घडली आहे. दोन्ही मुली काळेगाव येथील मामाकडे आल्या होत्या. खेळत असताना कुलरला हात लागल्यानं जोरदार शॉक लागला अन् यात दोघींचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

अत्यंत दुर्दैवी घटना, कूलरचा शॉक लागून दोन चिमुकलींचा मृत्यू
VIDEO: 'ब्राह्मण, मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या' मनोज जरांगेंच्या मागणीनं नवा वाद पेटणार?

मिळाल्या माहितीनुसार, या मुली खेळत असताना कुलर चालू करण्यास गेल्या. यावेळी कूलरला स्पर्श झाल्यानं जोरदार विजेचा शॉक लागला. यात ईशानी आणि प्रियांशी यांचा मृत्यु झाला आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. या घटनेने सर्वीकडे हळहळ व्यक्त होत आहे. यातच अकोल्यात मागील दीड महिन्यात आतापर्यत कुलरचा शॉक लागून 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अत्यंत दुर्दैवी घटना, कूलरचा शॉक लागून दोन चिमुकलींचा मृत्यू
Maharashtra Rain Video: राज्यात पुढील 4 दिवस जोर'धार'! पुणे, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

दरम्यान, यवतमाळ येथेही विजेचा शॉक एकाच मृत्यू झाल्याची आज घडली आहे. येथे विजेचा शॉक लागून खाजगी लाईनमनचा जागीच मृत्यू झाला आहे. रोहडा शिवारात ही घटना घडली आहे. नामदेव पांडुरंग मारकड, असे मृत खाजगी लाईनमनचे नाव आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com