सांगली : मोबाईलच्या स्टेटस (Mobile status) वरून सांगलीच्या कवठेमहांकाळ येथे शहरातील औधकर आणि पाटील या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. पाटील गटाने औंधकर यांच्या घरात शिरून लोखंडी रॉड, विटा, बांबूने मारहाण केली आहे. तर औंधकर गटाने पाटील गटातील अतुल पाटील, अनिकेत पाटील यांना मारहाण केली. दोन्ही गटांनी परस्परांना विरोधात फिर्यादी दिल्या आहेत. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two groups clash over mobile status in Sangli)
महेश औंधकर,मीनाक्षी औंधकर, मनीष औधकर. हे यामध्ये जखमी झाले आहेत. तर अनिकेत सुधाकर पाटील याने ही औंधकर गटाविरोधात फिर्याद दिली आहे. अतुल पाटील व अनिकेत पाटील हे यामध्ये जखमी झाले आहेत.
मनीष औंधकर याने मोबाईल वरती अनिकेत पाटील याच्या विरोधात स्टेटस ठेवला होता. याचा राग अनिकेत पाटील याला आल्याने त्याने प्रशांत पाटील,सुधाकर पाटील,पांडुरंग पाटील,अतुल पाटील,दिनकर पाटील यांच्यासह 10 ते 15 जणांच्या टोळक्याने बोलोरे, बुलेट, स्प्लेनडर वरून महेश औंधकर यांच्या काळे प्लॉट येथील घरावर हल्ला केला व लोखंडी रॉड,बांबू,आणि।विटाने मारहाण केली. तसेच घरातील महिला व मुलींना अश्शील भाषेत शिवीगाळ केली. औधकर कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. असे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून कवठेमहांकाळ पोलिसांनी अतुल पाटील,दिनकर पाटील,सुधाकर पाटील,प्रशात पाटील, अनिकेत पाटील,पांडुरंग पाटील यांच्यासह अनोळखी 10 ते 15 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.