Nashik News: धक्कादायक! नाशिकमध्ये दोन जिवलग मित्रांनी रेल्वेखाली उडी घेत संपवलं जीवन; मन सुन्न करणाऱ्या घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Two Friends End Life In Nashik Road Area: नाशिकमध्ये दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी आत्महत्या का केली, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
जिवलग मित्रांची आत्महत्या
Two Friends End Life Saam Tv

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

नाशिकमध्ये दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोघांनी जीवन का संपवलं, याचं कारण अजून समोर आलेलं नाही. हे दोघंही बारावीमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती मिळत आहे. विहितगाव रेल्वे गेटसमोर या दोन जिवलग मित्रांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. ही घटना आठ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

नाशिकरोड परिसरातील (Nashik News) दोन जिवलग मित्रांनी रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोघांनी आत्महत्या का केली, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहे. काल सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्थानक येथील मालधक्का रोडवरील वालदेवी नदी पुलावर ही घटना घडली आहे. या दोघांच्या मृत्युने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेत आत्महत्या करणाऱ्या तरूणांची नावं संकेत राठोड आणि सचिन दिलीप करवर अशी आहेत. हे दोघेही मालधक्कारोड एस. के. पांडे. शाळेजवळ राहत होते. या दोघांचंही वय अंदाजे १७ ते १८ वर्ष आहे. हे दोघेही इयत्ता बारावीत शिकत होते. या दोघा युवकांनी आत्महत्या का केली, हे अद्यापही समजू शकले नाही. मात्र, लहानपणापासूनच हे दोघेही जिवलग मित्र (Two Friends End Life In Nashik Road Area) होते.

जिवलग मित्रांची आत्महत्या
Kota Student End Life : कोटामध्ये आणखी NEET विद्यार्थ्याने जीवन संपवलं, वर्षभरातील आकडेवारी चिंताजनक

या दोन तरूणांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस करीत (Nashik Road Area) आहेत. दोन्हीही तरुणांचे मृतदेह (End Life) विच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने अख्खं गाव हादरलं आहे.

जिवलग मित्रांची आत्महत्या
Mumbai Police officer ends life : धक्कादायक! मुंबईत पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, पोलीस वसाहतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com