Goa: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना गोव्यात एंट्री

गोव्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने गोव्यात येण्यासाठीचा पर्यटकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
Goa: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना गोव्यात एंट्री
Goa: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना गोव्यात एंट्रीSaam Tv
Published On

अनिल पाटील

पणजी: कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर गोव्यात Goa मार्चपासून सरकारने संचारबंदी लागू करून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर आणि नागरिकांवर विविध प्रकारचे निर्बंध घातले होते. आता गोव्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने गोव्यात येण्यासाठीचा पर्यटकांचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या Mumbai High Court गोवा खंडपीठाकडून Goa Bench आज निर्णय देण्यात आला. त्यानुसार कोविड लसीकरणाचे Covid Vaccination दोन्ही डोस घेतलेल्या व हे डोस घेऊन चौदा दिवस उलटलेल्या पर्यटकांना गोव्यात प्रवेश करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयाने दिली आहे.

तर गोवा राज्यातील कोरोना Corona परिस्थिती नियंत्रणाखाली आली असली, तरी मृत्यूचे प्रमाण काही प्रमाणात आहेच त्यामुळे गोवा सरकारने एक आठवडाभर म्हणजे 2 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीत Curfew वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली.

Goa: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना गोव्यात एंट्री
Afghanistan Video: घाबरू नका, म्हणत अँकरने घेतली गन पॉईंटवर मुलाखत

ज्यांचे अद्यापि लसीकरणाचे दोन डोस झाले नाहीत त्यांनी मात्र कोरोणाची नकारात्मक चाचणी केलेली असावी असंही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून लागू करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com