Afghanistan Video: घाबरू नका, म्हणत अँकरने घेतली गन पॉईंटवर मुलाखत

चालू मुलाखतीत पत्रकाराला जबरदस्तीने त्यांचे कौतुक करण्यास भाग पाडलं जात असल्याचं दिसत आहे. शोच्या अँकरला चक्क गन पॉईंटवर मुलाखत घ्यावी लागली. याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
Afghanistan Video: घाबरू नका, म्हणत अँकरने घेतली गन पॉईंटवर मुलाखत
Afghanistan Video: घाबरू नका, म्हणत अँकरने घेतली गन पॉईंटवर मुलाखतTwitter/@AlinejadMasih
Published On

काबुल: तालिबानने Taliban अफगाणिस्तानवर Afghanistan कब्जा केला. मात्र त्यानंतर तालिबानकडून सांगण्यात येत की आम्ही स्वतःला बदललत आहोत, आमच्यापाहून घाबरण्याचे कारण नाही. तसेच माधयम आणि स्त्री स्वातंत्र्यचा उल्लेख केला गेला. मात्र हे ढोंगाच एक ताज उदाहरण कॅमेरा मध्ये कैद झालं आहे. काबुलमध्ये Kabul एका टीव्ही शोमध्ये तालिबानच्या दहशतवाद्यांची एंट्री झाली. आणि चालू मुलाखतीत Interview त्या पत्रकाराला जबरदस्तीने त्यांचे कौतुक करण्यास भाग पाडलं जात असल्याचं दिसत आहे. शोच्या अँकरला चक्क गन पॉईंटवर Gun Point मुलाखत घ्यावी लागली. याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. (Afghanistan Latest News)

या व्हिडिओबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, न्यूज स्टुडियोमध्ये तालिबान कमांडर कारी समिउल्लाह याची मुलाखत सुरू होती. यावेळी त्याच्यासोत इतर सात तालिबानी दहशतवादी AK-47 बंदुका घेऊन आले. व्हिडिओत दिसून येत असल्या प्रमाणे संपूर्ण मुलाखतीदरम्यान हे सात जण तिथेच टीव्ही अँकरच्या मागे उभे होते. या व्हिडिओवरुनच अफगाणिस्तानातील येणारी परिस्थिती कशी असेल, याचा अंदाज येतो. भिऊ नका, अफगाणिस्तानच्या न्यूज अँकरचे हे शब्द आहेत. आणि त्याच्या मागे बंदूक घेऊन तालिबानी उभे असलेले दिसत आहे.

पत्रकार मसील अलिनेजाव यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ''हे अवास्तव आहे. तालिबानी स्पष्टपणे अतिरेकी बंदुकीसह भयभीत टीव्ही होस्टच्या मागे उभे आहेत आणि त्याला असे सांगण्यास भाग पाडत आहेत की #अफगाणिस्तानच्या लोकांना इस्लामिक अमिरातीपासून घाबरू नये. तालिबान स्वतः लाखो लोकांच्या मनातील भीतीचा कारण आहे. हा फक्त पुरावा आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com