Bardipada Dam: धरणातील पाण्याचा अंदाज न आल्यानं २ सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

Bardipada Dam: धरणातील खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं २ सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
Bardipada Dam
Bardipada Damsaam Tv
Published On: 

Bardipada Dam:

नंदूरबार जिल्ह्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धरणात दोन सख्खा भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यन गोरख वळवी (वय 14), प्रीतम गोरख वळवी (वय 12) असे या दोघांची नावे आहेत.

मृत मुलांच्या शेतालगत धरण होते. ते दोघे पोहण्यासाठी धरणात उतरले. परंतु त्यांना धरणातील खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा पाण्यात बुडून मुत्यू झाला. दोघेजण धरणात बुडाल्याची माहिती स्थानिकांना माहिती होताच त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांना स्थानिकांनी पाण्यात बाहेर काढलं. त्यानंतर दोघांना उपचारासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती गावात पसरल्याने गावकऱ्यांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दोन्ही सख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवासांपूर्वी नंदूरबारमधील कोंढावळ येथील लखन नरेंद्र माळी या कबड्डी खेळाडूचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. लखन हा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील अहिंसा पॉलिटेक्निक कॉलेजला इलेक्ट्रॉनिक डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. शेतातून मजुरी करून येत असताना त्याला पोहण्याचा मोह आला. त्यासाठी तो पाण्यात गेला तो बाहेर आलाच नाही.

Bardipada Dam
Solapur News : नवीकोरी कार जीवावर बेतली, सोलापुरातील शिक्षकाचा कारसह विहिरीत बुडून मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com