Dhule : धुळ्यात दोन दिवसात दोन मोठ्या अधिकाऱ्यांची बदल्या!

धुळे महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांची कालच बदली झाली असून त्यांच्यापाठोपाठ धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांची देखील बदली झाली आहे.
धुळ्यात दोन दिवसात दोन मोठ्या अधिकाऱ्यांची बदल्या !
धुळ्यात दोन दिवसात दोन मोठ्या अधिकाऱ्यांची बदल्या !भूषण अहिरे
Published On

धुळे : महाराष्ट्रात पोलिस दलात आज मोठे फेरदल झाले असून राज्यातील १८३ पोलिस उपायुक्त, अप्पर पोलिस अधिक्षक पोलिस अधिक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये दोन दिवसात दोन मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. धुळे महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांची कालच बदली झाली असून त्यांच्या जागी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त पदी देविदास टेकाळे यांची नियुक्ती झाली आहे.

हे देखील पहा :

त्यापाठोपाठ धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागी आता पोलीस अधीक्षक पदी प्रवीण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांची नागपूर उपायुक्त पदी वर्णी लागली आहे.

धुळ्यात दोन दिवसात दोन मोठ्या अधिकाऱ्यांची बदल्या !
सचिन वाजे दिशाभूल करीत असल्याचे समजायला मुख्यमंत्र्यांना सहा महिने लागले : मुनगंटीवार

तर, नव्याने धुळे जिल्ह्यासाठी अधीक्षक पदी नियुक्त झालेल्या प्रवीण पाटील यांनी यापूर्वी नवी मुंबई येथे गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदी काम बघितले आहे. दोन दिवसात दोन मोठ्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर धुळेकर चांगलेच संभ्रमात पडले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com