बीडमध्ये एकाच दिवशी दोन 16 वर्षीय मुलींनी केली आत्महत्या!

एकीने घेतला गळफास तर दुसऱ्या मुलीने मारली विहीरीत उडी !
बीडमध्ये एकाच दिवशी दोन 16 वर्षीय मुलींनी केली आत्महत्या!
बीडमध्ये एकाच दिवशी दोन 16 वर्षीय मुलींनी केली आत्महत्या!Saam Tv

विनोद जिरे

बीड: बीड Beed जिल्ह्यात विविध ठिकाणी दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काल बीडच्या नेकनूरमध्ये एकीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर केज तालुक्यातील मस्साजोग येथे दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा-

रूपाली मुळे (वय -16 रा. नेकनूर) व कोमल गोविंद गायकवाड (वय 16 रा. मस्साजोग) अशी आत्महत्या केलेल्या दोन मुलींची नावे आहेत. तर या दोन्ही मुलींनी आत्महत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झालं नसून याप्रकरणी नेकनूर व केज पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद झाली आहे.

बीडमध्ये एकाच दिवशी दोन 16 वर्षीय मुलींनी केली आत्महत्या!
धक्कादायक प्रकार! रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; बाळंत महिलेलाही मारहाण

दरम्यान, सध्या तरूण-तरुणींच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने, तरूण पिढीत निर्णय क्षमता आणि अडचणींवर मात करण्याची क्षमता कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर, वैचारिक क्षमता देखील कमी होत चालल्याने क्षणभराचाही विचार न करता थेट आत्महत्येचा पर्याय सध्याची तरुण पिढी निवडत आहे. त्यामुळं त्यांना योग्य वयात योग्य मार्गदर्शनाची मिळण्याची गरज आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com