Agriculture News: कापूस,सोयाबीन पाठोपाठ तुरीच्या भावात घसरण; 3 दिवसात 300 रुपयांनी घसरले भाव

Amravati News: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला १० हजार ६२५ रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला होता... मात्र हा भाव स्थिर राहू शकला नाही.
Agriculture News
Agriculture NewsSaam TV
Published On

Tur Dal Price Dropped:

अमरावती जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनच्या भावाने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. मात्र तुरीचे भाव १०२०१ रु. च्या वर पोहोचल्याने तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र जसजसे तुरीचे पिक मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली, तसतसा तुरीने सुद्धा रिव्हर्स गिअर टाकायला सुरुवात केली.

Agriculture News
Agriculture News : लष्करी अळीने ज्वारीला घेरले; भुम तालुक्यातील शेतकरी हवालदिल

गेल्या तीन दिवसात ३०० रुपयांपर्यंत भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. किमान तुरीचे भाव दिलासा देत १२००० रु. वर पोहोचतील अशी आशा होती. १०२०१ रु. क्विं. चे भाव बुधवारला अमरावती एपीएमसीत ९९०१ रुपयांवर घसरल्याने शेतकरी संभ्रमात पडला आहे. दरम्यानच्या काळात अवकाळी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असतानाच बाजारात तुरीचे दर वाढले होते. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला १० हजार ६२५ रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला होता... मात्र हा भाव स्थिर राहू शकला नाही.

काही काळ १०२०० रुपयापर्यंत स्थिर राहिलेली तूर मंगळवारी ९९५१ रु. क्विं. आणि त्यानंतर बुधवारला ९९०१ रु. क्विंटलवर घसरली आहे. तर अमरावती कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये तुरीची आवक ११ हजार ४६१ क्विंटलवर पोहोचली आहे.

Agriculture News
Agriculture News : हळद तेजीत, कापसाच्या दरात घसरण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com