भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला.. यावेळी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामीनावर बाहेर असणाऱ्या आरोपी संतोष परमेश्वरनंही भाजपात प्रवेश केलाय....ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही घडामोड झाल्यामुळे आता यावरून जोरदार राजकारण पेटलंय. विरोधकांनी यावरून भाजपला चांगलंच घेरलंय.
तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीला भाजपात प्रवेश दिला.. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात झाले..ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता वाटली.. प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार त्याचवेळी समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे.. या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांवर योग्य ती कारवाई कराल..
याआधी सलीम कुत्ता प्रकरणात भाजपनं सुधाकर बडगुजरांविरोधात रानं उठवलं होतं... मात्र त्यानंतर त्याचा भाजप पक्षप्रवेश चांगलाच चर्चेत राहिला होता... आता थेट तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेल्या संतोष परमेश्वर यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानं नगरपरिषदेच्या निवडणुकीत ड्रग्ज तस्करीचा मुद्दा पुन्हा गाजणार असल्य़ाचं दिसतंय. त्यामुळे भाजप संतोष परमेश्वरच्या प्रवेशाबाबत काय निर्णय़ घेणार याकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.