मुबंई राष्ट्रीय मार्गावर ट्रकला भीषण आग

मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय मार्गावर एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातग्रस्त ट्रकने ३ ते ४ इतर वाहनांना धडक दिल्याने काहीजण या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुबंई राष्ट्रीय मार्गावर ट्रकला भीषण आग
मुबंई राष्ट्रीय मार्गावर ट्रकला भीषण आगSaam Tv
Published On

विकास मिरगणे

रायगड : मुंबई-पुणे Pune जुन्या राष्ट्रीय मार्गावर एका ट्रकला भीषण आग Fire लागल्याची घटना घडली आहे. या अपघातग्रस्त ट्रकने ३ ते ४ इतर वाहनांना धडक दिल्याने काहीजण या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे मार्गावर बोरघाट उतरुन पनवेलकडे जाणाऱ्या ट्रकला Truck इंदिरा गांधी चौकातील पुलावर अचानक आग लागल्याची घटना घडली असून अपघातामुळे मुंबईकडे Mumbai येणारी वाहतूक संथ गतीने होत आहे.

हे देखील पहा -

अपघातग्रस्त ट्रकचे सर्व चाके निखळली असुन ट्रक पुर्ण पणे भरलेला असल्याने रस्त्याच्या मधोमध क्षतिग्रस्त झालेला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. खोपोली अग्निशमन दलाने २ टँकरच्या मदतीने ही आग अटोक्यात आणली आहे. ही आग कशी लागली याची माहिती समोर आलेली नाही.

प्राथमिक अंदाजानुसार या ट्रकची धडक अन्य वाहनाशी झाल्याने ट्रकने पेटघेतल्याचेसांगण्यात आले आहे. या अपघातात महाराष्ट्र सुरक्षा बलातील मोहन बोरसे नावाचा जवानही जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुबंई राष्ट्रीय मार्गावर ट्रकला भीषण आग
अवघ्या १२ वर्षाच्या असताना दिलीप कुमार यांच्यावर होते सायरा बानोचे प्रेम

जखमींना खोपोलीतील नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. खोपोली पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्य एकेरी मार्गावर दोन्ही बाजुकडील वाहतुक सुरु केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com