सांगलीत तिहेरी हत्याकांड; जमावाकडून तिघांची हत्या

दुधोंडी पलूस या ठिकाणी वसंतनगर भागात काल दुपारी एका जमावाने धारदार शस्त्राने वार करून तिघांची हत्या केली आहे.
सांगलीत तिहेरी हत्याकांड; जमावाकडून तिघांची हत्या
सांगलीत तिहेरी हत्याकांड; जमावाकडून तिघांची हत्याSaam Tv
Published On

सांगली : दुधोंडी Dudhondi पलूस Palus या ठिकाणी वसंतनगर भागात काल दुपारी एका जमावाने धारदार शस्त्राने वार करून तिघांची हत्या Murder केली आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या घटनेमध्ये ४ गंभीर जखमी झाले आहेत. अरविंद बाबूराव साठे (वय- ६०), सनी आत्माराम मोहिते (वय- ४०) आणि विकास आत्माराम मोहिते (वय- ३६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमध्ये स्वप्निल साठे, दिलीप साठे, संग्राम मोहिते, आकाश मोहिते असे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर सांगली Sangli मधील शासकीय रुग्णालयात hospital उपचार सुरू आहेत. घटनास्थळी जिल्ह्यामधून पोलिसांची Police कुमक पाठविण्यात आली आहे. या घटनेत दुधोंडी परिसरात तणावाचे वातावरण पसरलेले आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. चाकू, गुप्ती, काठ्यांसह अन्य धारदार शस्त्रे आणि दगडांचाही वापर करून हा हल्ला करण्यात आला आहे. तासभर या भांडणाची धुमश्चक्री सुरू होती. दुचाकी वाहनांचीही देखील या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

याप्रकरणी प्रवीण विलास मोहिते, आदित्य विलास मोहिते, हिम्मत मधुकर मोहिते, विजय मधुकर मोहिते, किशोर प्रकाश मोहिते, वनिता विलास मोहिते, संगीता मधुकर मोहिते, मधुकर धोंडिराम मोहिते या संशयितांची नावे सध्या समोर आली आहेत. यामधील ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत कुंडल पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, शनिवारी किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. याबाबत पोलिसांत तक्रार देखील दाखल झाली होती.

रविवारी दुपारी या प्रकरणात काही जणांना पोलीस ठाण्याकडे जात असताना संशयित प्रवीण मोहिते, आदित्य मोहिते, हिम्मत मोहिते, विजय मोहिते, किशोर मोहिते, वनिता मोहिते, संगीता मोहिते, मधुकर मोहिते यांनी आमच्याच लोकांना तुम्ही मारहाण करून खोटी तक्रार का दिली. अशी विचारणा करत दुसऱ्या गटामधील लोकांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली होती. या हाणामारीत संशयितांनी धारदार शस्त्रे, लोखंडी पाइप, काठ्यांनी मारहाण केली आहे.

सांगलीत तिहेरी हत्याकांड; जमावाकडून तिघांची हत्या
बारा तासांत बदला, नागपुरात सिनेस्टाईल दुहेरी हत्याकांड!

यामध्ये सनी मोहिते, अरविंद साठे, विकास मोहिते यांच्या छाती, पोटावर वर्मी घाव लागल्यामुळे अतिरक्तस्राव झाला आहे. आरोपींनी लगेच पलायन केले होते. सर्व जखमींना स्वप्निल साठे आणि त्यांचे मित्र, नातेवाइकांनी दुचाकीवरून पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. सनी मोहिते, अरविंद साठे, विकास मोहिते मृत झाल्याचे यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली आहे. या ठिकाणी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणात ८ संशयितांची नावे समोर आली आहेत. ६ जणांना ताब्यात घेतले आहे. आणि २ सध्या उपचार घेत आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी माहिती दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com