बारा तासांत बदला, नागपुरात सिनेस्टाईल दुहेरी हत्याकांड!

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची दगडाने ठेचून हत्या.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची दगडाने ठेचून हत्या.
Published On

मंगेश मोहिते

नागपूर ः दुहेरी हत्याकांडाने नागपूर नगरी हादरली आहे. शुक्रवारी रात्री एका तरूणाचा जमावाने खून केला होता. त्या हत्याकांडातील आरोपीचाही दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. फरार आरोपीची बदल्याच्या भावनेतून हत्याच झाल्याची चर्चा आहे.

शहराच्या अजनी ठाण्याच्या हद्दीतील कौशल्यानगर परिसरात दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची दगडाने ठेचून हत्या.
7 पर्यंत दुकाने सुरू राहणार अजित पवारांचे संकेत

गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीत गुन्हेगारी वाढत आहे. आजच्या घटनेने गुन्हेगारीचा आलेख आणखी वर गेला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कौशल्यानगर परिसरात स्वयंदीप नगराळे नावाच्या 21 वर्षीय युवकाचा परिसरातील 7 ते 8 युवकांकडून खून करण्यात आला. या घटनेत अजनी पोलिसांनी तात्काळ 3 आरोपींना अटक केली. मात्र, या खुनातील मुख्य आरोपी शक्तिमान गुरुदेव हा फरार होता.

परिसरातील काही युवकांना तो भांडे प्लॉट चौकाजवळ आपल्या नातेवाईकाच्या घरी लपून बसला असल्याची माहिती मिळाली. काही तरूणांनी भांडे प्लॉट चौकातून शक्तिमान याला पकडून कौशल्यानगर परिसरात आणले. तेथे त्याला अक्षरशः दगडाने ठेचून मारले. Two youths killed in Kaushalyanagar area of Nagpur

शुक्रवारी स्वयंपूर्ण नगराळे याचा सात-आठजणांनी खून केला होता.
शुक्रवारी स्वयंपूर्ण नगराळे याचा सात-आठजणांनी खून केला होता.

स्वयंदीप हा शुक्रवारी रात्री जेवण करून घराबाहेर शेजारच्या ऑटोमध्ये बसला होता. त्यावेळी त्याच्यावर 7 तरूणांनी शस्त्रानिशी हल्ला चढवला. आणि त्यातच स्वयंदीप चा मृत्यू झाला. या प्रकरणात 3 आरोपींना अटक झाली आहे. त्याच्या खुनातील मुख्य आरोपी आज सकाळी आरोपी शक्तिमानचादेखील दगडाने ठेचून खून करण्यात आला.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी शक्तिमानचा परिसरात दबदबा होता. आणि त्याच्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त  झाले होते. काही ठिकाणी अवैध जुगारअड्डा या हत्येच्या मागचे खरे कारण असल्याचे बोलले जात आहे. Two youths killed in Kaushalyanagar area of Nagpur

परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त

एकंदरी मागच्या 12 तासांत  नागपूरमध्ये झालेल्या या थरारक हत्याकांडाने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले  आहे. आज या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः घटना स्थळावर जाऊन पाहणी करीत परिस्थितीचा आढावा घेतला.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com