Trimbakeshwar Temple: आरं देवा, तुझ्या देवळात चोरट्यांचा फड! त्र्यंबकेश्वरमध्ये VIP दर्शनाच्या नावाखाली लूट|VIDEO

Fake VIP Tickets Scam: त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची सर्रासपणे लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र, हा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे असे नाही, तर या आधीही येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची लूट होत असल्याचे समोर आले होते.
त्र्यंबकेश्वर मंदिर
त्र्यंबकेश्वर मंदिरSaam Tv
Published On

नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जास्त पैसे घेऊन खोटे तिकीट विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुजरात राज्यातील सूरत येथील भविकासोबत असा प्रकार घडला असून थेट दर्शनासाठी असलेली 200 रुपयांची तीन व्हीआयपी तिकिटे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भेटलेल्या एका व्यक्तीने 2 हजार रुपयांनी विकली. मात्र, ही तिकिटे मंदिराच्या प्रवेशद्वारी असलेल्या संगणकीय स्कॅनिंग यंत्राने स्वीकारली नाही म्हणून हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

काल संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात चिराग दालिया हे सोबत दोन व्यक्तिना घेऊन दर्शनसाठी आले होते. मंदिराच्या उत्तर महाद्वाराजवळ त्यांना एक अनोळखी व्यक्ति भेटली. त्याने लगेचच दर्शन करून देतो असे सांगितले व त्याच्याजवळ असलेले त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे तीन लोकांचे प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे असे 600 रुपये किंमत असलेले व्हीआयपी तिकीट दालिया आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तिंना 2 हजार रुपये घेऊन विकले. ते लोक पास घेऊन ते व्हिआयपी दर्शनासाठी उत्तर महाद्वारजवळ आले.

त्र्यंबकेश्वर मंदिर
Cyber Crime : शेअर्समध्ये अधिकचा नफ्याचे आमिष पडले महागात; ७७ लाख रुपयांची फसवणूक

तेव्हा ते तिकीट स्कॅनिंग करताना खोटे असल्याचे दाखवत यंत्राने ते स्वीकारले नाही. त्यामुळे त्यांना सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेश दिला नाही. संगणकीय प्रणालीमध्ये तिकीटावरील तपशील व सदर भाविकाचा आधार कार्डवरील नाव हे वेगेवेगळे आहे. त्यामुळे तुमचे तिकीट अमान्य करण्यात आले असे सांगितले.

त्र्यंबकेश्वर मंदिर
Maharashtra Politics: भाजपच्या या आमदाराला अजित पवार नकोसे|VIDEO

आपली फसवणूक झाल्याचे भाविकाला लक्षात आले आणि त्याने ट्रस्ट कार्यालयात धाव घेतली. देवस्थान चेअरमन यांचे नावे लेखी तक्रार अर्ज केला. त्यामध्ये तिकीट देणाऱ्या व्यक्तीची माहिती देण्यात आली असून त्याचे नाव नारायण आहे. याबाबत नारायण या व्यक्तीवर कलम 318 प्रमाणे लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com