Nashik News: वसतिगृहातील आठवी-नववीच्या विद्यार्थिनींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचवलं? त्र्यंबकेश्वरमधील संतापजनक प्रकार

Nashik Crime News: त्र्यंबकेश्वरजवळच्या एका खासगी वसतिगृहात विद्यार्थिनींना जबरदस्तीने नाचवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSAAM TV
Published On

Girl Students Forced To Dance In Front Of Tourists: त्र्यंबकेश्वरजवळच्या एका खासगी वसतिगृहात विद्यार्थिनींना जबरदस्तीने नाचवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलींना पारंपरिक नृत्य आणि संगणक शिक्षण देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात संगणक शिक्षण दिलं नसल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी पारंपरिक नृत्य करणाऱ्या या विद्यार्थिनींना जबरदस्तीने पर्यटकांसमोर हे नृत्य सादर करण्यास भाग पाडल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील सर्वहरा परिवर्तन केंद्र या खासगी संस्थेच्या विनाअनुदानित इंग्रजी शाळेत या विद्यार्थिनी शिकण घेतात.

Nashik Crime News
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: 'मला अर्धवटराव म्हणत असतील तर...'; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर जोरदार पलटवार

शाळा सुरू होण्यास १५ दिवसांचा अवधी शिल्लक असताना वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना ३१ मे रोजी पारंपरिक नृत्य आणि संगणक शिक्षण दिल जाणार असल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात संगणक शिक्षण दिलं नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय.

याशिवाय शाळेमागील टेकडीवर हॉटेल असून तिथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान नाचण्यास सांगितले जाते. नाचले नाही तर शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात आणि छड्या मारतात अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. मुलींच्या तक्रारीनंतर पालकांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Breaking News)

Nashik Crime News
Congress Vs NCP: 'अन्यथा मिटकरींचा संजय राऊत होईल', सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने?

विद्यार्थिनींना जबरदस्तीने नाचायला लावल्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास झाल्याची पालकांची तक्रार आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पालकांनी मुलींना दुसऱ्या शाळेत दाखल केलंय, तर संस्थेकडून मात्र असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. झालेली तक्रार गैर समजूतीतून झाल्याचं संस्थेने म्हटलंय. (Crime News)

या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता चौकशीत नेमकं काय समोर येतं. हे पाहणं महत्वाचं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com