Solapur News: विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरून महाविकास आघाडीत वातावरण तापण्याची शक्यता आहे. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आमने सामने आल्याचं चित्र दिसत आहे. नुकतंच काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी महाले म्हणाले आहेत की, ''विरोधीपक्ष नेता कोण असेल याचा निर्णय संख्याबळावर होतं असतो. विधानपरिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे नऊ नऊ जागा होत्या, मनीषा कायंदे शिंदे गटात गेल्याने त्यांच्या जागा कमी होईल.''
ते म्हणाले आहेतकी, ''महाविकास आघाडीतील काही नेत्यांना विनंती आहे की, विरोधी पक्ष नेता कोण होईल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्यामुळे आता लुडबुड करण्यात मजा नाही.
अमोल मिटकरी यांना लगावला टोला
काकासाहेब कुलकर्णी महाले म्हणाले की, अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आता कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यांच्यातला उद्याचा संजय राऊत मला आज दिसतोय. मिटकरी यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबलं तर ते महाराष्ट्रात नेते म्हणून परिचत होतील. अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही. (Latest Marathi News)
भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) जाहिरात वादावर बोलताना ते म्हणाले, ''काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने स्वतःच स्वतःचा सर्व्हे केला आणि त्यानंतर आपण देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा मोठे आहोत, हे सांगणारी जाहिरात प्रसिद्ध केली. आता देवेंद्र फडणवीस सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. लगीन लोकांचं आणि नाचतय येड्या डोक्याचं ही म्हण या दोघांना लागू होते. तू मोठा की मी मोठा ही स्पर्धा महाराष्ट्रच्या विकासासाठी अतिशय घातक आहे.''
काकासाहेब कुलकर्णी महाले म्हणाले, ''सरकार येऊन जवळपास ११ ते १२ महिने झाले आणि राज्यातील जवळपास १२ उद्योग दुसरीकडे गेले आहेत, पण या दोघांना महाराष्ट्राच्या विकासाचे काहीही देणे घेणे नाही. एसटी विलनीकरण, मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षण बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. पण ते आता विसरले आहेत.
महाले म्हणाले, ''पुढच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी पक्षतील, विरोधी पक्षातील अडथळे दूर करण्याचे काम भाजप करत आहे.'' ते म्हणाले, मागच्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांची जाहिरात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची आली. राज्यात विकासाची कामे सोडून केवळ जाहिरातींची हीच स्पर्धा सुरू राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.