सातारा : श्रावणातील दुसऱ्या सोमवारी 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव मंदिरात शंभू महादेवाच्या पिंडीवर मनमोहक अशी राष्ट्रध्वजाच्याNational Flag रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.Triangular flower decoration in the temple at Shikhar Shinganapur
हे देखील पहा-
दरवर्षी शिखर शिंगणापूरShikhar Shinganapur येथे श्रावण महिण्यामध्ये शंभू महादेवाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आत्ताही श्रावणमास सुरु झाला आहे आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे परंतु कोरोना संसर्गाच्या Corona Pandamicपार्श्वभूमावर गेल्या दोन वर्षापासून शिंगणापूरमधील श्री शंभू महादेवाचे मंदिरMahadev Temple भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आज श्रावणातील दुसरा सोमवारचे आणि काल झालेल्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मंदिराच्या गाभाऱ्यात व परिसरात सुंदर अशी राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या फुलांची सजावटFloral decoration करण्यात आली आहे.
मंदिर गाभाऱ्यात स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शंभू महादेव मंदिरातील पिंड व गाभारा फुलांनी तिरंगी झेंड्याची आरास करण्यात आली आहे. भाविक भक्तांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानेadministration मंदिर परिसरात जमावबंदीचाCurfew in Temple Area आदेश लागू केले असून पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. येणाऱ्या भाविकांची वहाने व लोकांना मंदिरापासून दीड किलोमीटर अंतरावर प्रवेश दिला जात नाही यामुळे शिखर शिंगणापूर मध्ये श्रावणमहिण्यात नेहमीचा असणारा उत्सवाचा काळ यावेळी मात्र सुन्न आहे.
Edited By-Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.