Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओची अभिनव संकल्पना; दिंड्यांसाठी वॉक ऑन राईट उपक्रम

पाऊले चालती पंढरीची वाट...
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023Saam Tv
Published On

Pandharpur Wari 2023: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी वारीच्या निमित्ताने सध्या वारकरी भक्तांनी पंढरपूरची वाट धरली आहे. याच वारकरी भक्तांच्या रस्त्यावरील सुरक्षेसाठी आता परिवहन विभाग पुढे आला आहे. नागरिकांना रस्त्यावर डाव्या बाजूने चाला असे सांगितले जाते. पण आता परिवहन विभाग वॉक ऑन राईट अर्थात उजव्या बाजूने चला. या संकल्पनेतून पंढरपूरच्या वाटेवरील दिंड्यांचे प्रबोधन करून वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जागृती करत आहे. (Latest Marathi News)

Ashadhi Wari 2023
Maharashtra Politics: पंकजा मुंडेंना मोठी राजकीय संधी; 'या' पक्षाकडून थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर, चर्चेला उधाण

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरला (Pandharpur) येत आहेत. पायी दिंड्या पंढरपूरला येत असताना कुठल्याही प्रकारचा अपघात अथवा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी आता परिवहन विभागाने वारकरी दिंड्यांना उजव्या बाजूने चला अशी मोहीम हाती घेतली आहे.

त्यासाठी आरटीओ (RTO) विभागाची वाहने 15 पथकांच्या द्वारे पेट्रोलिंग करत वॉक ऑन राईट याबाबतचे प्रबोधन करत आहेत. तसेच वारकरी दिंड्यांमध्ये अधिकारी उतरून त्यांना वाहतुकीचे नियम सांगत पंढरपूरला आलेले आपण सारे देवदूत वारी करून परतत असताना आपण इतर लोकांना वाहतुकीचे नियम सांगावेत. यासाठी देवदूत असा टॅग परिवहन विभागाकडून वारकऱ्यांना देण्यात आला आहे. याशिवाय वाहतूक सुरक्षेचा एक हँडबँड देखील बांधण्यात आला आहे. (Pandharpur News)

Ashadhi Wari 2023
Mahrashtra Politics: राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार! अजित पवारांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार? विरोधी पक्षनेतेपदासाठी मुंडेंच्या नावाची चर्चा

एरवी सर्वसाधारणपणे कडक व शिस्तीचे नियम सांगणारे आरटीओ अधिकारी यंदाच्या वारीत मात्र वारकरी व महाराज मंडळींच्या रूपात सात्विक भाषेत परिवर्तन करताना दिसून आले. पंढरीची वारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रस्ता सुरक्षेचा अभियान पोहोचवण्याचा एक प्रभावी माध्यम आहे. या हेतूने आरटीओ प्रबोधन अभियान राबवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com