Jalna Accident: साईंच्या दर्शनापूर्वी काळाचा घाला, ट्रक-कारची समोरासमोर धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Jalna Police: जालनामध्ये ट्रक-कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात होते.
Jalna Accident: साईंच्या दर्शनापूर्वी काळाचा घाला, ट्रक-कारची समोरासमोर धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Jalna AccidentSaam Tv
Published On

अक्षय शिंद, जालना

जालनामध्ये भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जालन्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. रविवारी रात्री उशिरा साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात परप्रांतीय दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील इतर ५ जण जखमी झालेत.

Jalna Accident: साईंच्या दर्शनापूर्वी काळाचा घाला, ट्रक-कारची समोरासमोर धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Pune Accident : हळदीचा कार्यक्रम आटोपून परतताना दुचाकीचा अपघात, MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये जी. रामू (वय ४५ वर्षे) आणि जी. माधुरी (वय ४० वर्षे) या दाम्पत्याचा समावेश आहे. हे दोघेही हैदराबादचे रहिवासी होते. हैदराबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असताना अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामधील ५ जण जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला. मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले.

Jalna Accident: साईंच्या दर्शनापूर्वी काळाचा घाला, ट्रक-कारची समोरासमोर धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Accident : ट्रक अन् ट्रेलरची जोरदार धडक, भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर

अपघाताची माहिती मिळताच, जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या ५ जणांना पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींवर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे. सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गु्न्हा दाखल केला आहे.

Jalna Accident: साईंच्या दर्शनापूर्वी काळाचा घाला, ट्रक-कारची समोरासमोर धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Accident News : लग्नात भाचीला आशीर्वाद देऊन परतलेल्या मामावर काळाचा घाला; घरी परतताना दुचाकीला अपघात, मामी जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com