Samruddhi Mahamarg: महामार्गावर कार बंद पडली, मदतीसाठी शेतकरी धावून आले; भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Car-Tempo Accident: संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रेम्पोने तिघांना चिरडलं. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शेतकऱ्याचा समावेश आहे.
Samruddhi Mahamarg: महामार्गावर कार बंद पडली, मदतीसाठी शेतकरी धावून आले; भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू
Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. संभाजीनगरमधील जयपूर शिवारात कारला टेम्पोने धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंक्चर झालेली कार बाजूला काढत असताना पाठूमागून आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. मृतांमध्ये शेतकऱ्याचा देखील समावेश आहे.

समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात एका कारचा टायर पंक्चर झाला. चालकाने खाली उतरून कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. चालकाच्या मदतीसाठी शेजारील शेतात काम करणारे दोन शेतकरी आले. तिघेही कार बाजूला घेत होते. त्याचवेळी भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक योगेश दत्तात्रय घाटेकर (३८ वर्षे, केळगाव, ता. निफाड, जि. नाशिक) आणि शेतकरी देविदास नाना मते (६० वर्षे, रा. जयपूर, ता. छत्रपती संभाजीनगर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Samruddhi Mahamarg: महामार्गावर कार बंद पडली, मदतीसाठी शेतकरी धावून आले; भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू
Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

या अपघातामध्ये बाळू विश्वनाथ घाटेकर (६० वर्षे, राकेळगाव, ता. निफाड, जि. नाशिक) हे गंभीर जखमी झाले. योगेश दत्तात्रेय घाटेकर हे कारने समृद्धी महामार्गाने निफाडहून रेशीम विक्रीसाठी जालन्याला जात होते. प्रवासादरम्यान त्यांची कार समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात पंक्चर झाली. त्यांनी ती महामार्गाच्या बाजूला उभी केली. या वेळी त्यांनी महामार्गालगत असलेल्या शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले.

Samruddhi Mahamarg: महामार्गावर कार बंद पडली, मदतीसाठी शेतकरी धावून आले; भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू
Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

देविदास मते आणि आणखी एक शेतकरी त्यांच्या मदतीसाठी धावून आला. ते तिघे कारच्या बाजूला उभे करत होते. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं. या अपघातात कार चालक योगेश घाटेकर आणि मदतीला आलेले शेतकरी देविदास मते हे दोघे जागीच ठार झाले. तर गाडीत सोबत असलेले बाळू घाटेकर हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले आणि अपघाताचा तपास सुरू केला.

Samruddhi Mahamarg: महामार्गावर कार बंद पडली, मदतीसाठी शेतकरी धावून आले; भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू
Accident: वडिलांच्या अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com