Ahilya Nagar : दोन बहिणी पोहायला पाण्यात उतरल्या, वर आल्याच नाहीत, वाचवायला गेलेला तरूणही बुडाला, कर्जतमधील दुर्दैवी घटना

Ahilya Nagar News : नदीत पोहायला गेलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दोन्ही बहिणींना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू झाला आहे.
Ahilya Nagar
Ahilya Nagar News Saam tv
Published On

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ताजू गावच्या शिवारात दुर्दैवी घटना घडली आहे. ताजू गावात घोडकाव्याच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिपाली आणि ऐश्वर्या अशा दोन्ही सख्ख्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. घोडकालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे.

दिपाली वणेश साबळे (वय 14) आणि ऐश्वर्या वणेश साबळे (वय10) असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. त्यांच्यासोबत आणखी दोन लहान मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याला वेग जास्त असल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही मुले पाण्यात बुडू लागली. यावेळी जोरात आरडाओरडा केल्याने त्याच ठिकाणी ग्रामपंचायतचा कर्मचारी कृष्णा रामदास पवळ (वय 26 वर्ष) हा शेतामध्ये काम करत होता. त्याने आवाज ऐकून त्या ठिकाणी धाव घेतली.

Ahilya Nagar
Uddhav Thackeray : संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा; उद्धव ठाकरेंकडून ओपन चॅलेंज

तरुणाने पाण्यात उडी मारून त्यांनी दोन जणांना पाण्याच्या बाहेर काढले. त्यानंतर या २ मुलींना पाण्यामधून बाहेर काढण्यासाठी उडी मारली. मात्र त्या दोन मुलींना वाचवताना त्याचाही पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तीन मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आली आहेत. रुग्णालयामध्ये या मुलींच्या आईने हंबरडा फोडला. एकाच वेळी स्वतःच्या दोन मुली गमावल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Ahilya Nagar
Horrific incident : दोघांमध्ये तिसरा आला अन् घात झाला; प्रेमात आंधळ्या झालेल्या रीलस्टारने नवऱ्याला संपवलं

मायलेकासह मावशी तापीत बुडाली

तापी नदीवर अंघोळीसाठी गेलेला बालक, त्याची आई आणि मावशी अशा तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावल तालुक्यातील अंजाळे गावात महिला गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या.नकुल भिल (५), त्याची आई वैशाली भिल आणि मावशी सपना सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. अंजाळे गावातील घाणेकर नगरातील बादल लहू भिल यांच्याकडे रविवारी गोंधळाचा कार्यक्रम होता. यासाठी हे तिघे अंजाळे येथे आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com