विजय पाटील
सांगली - सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापारी आता दुकाने उघडण्यासाठी आक्रमक झाले आहेत. उद्या गुरुवार पासून शहरातील व्यापार सुरू करण्याचा निर्धारच व्यापारयांनी केला आहे. Trade Federation decides to open shops in Sangli Municipal Corporation area from tomorrow
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दुकाने उघडण्याबाबत प्रशासनाने वेळेची मर्यादा घालून परवानगी द्यावी अन्यथा जगण्यासाठी आम्हाला दुकाने उघडण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा सांगली व्यापारी महासंघाने दिला आहे.
हे देखील पहा -
सांगली जिल्ह्यामध्ये 12 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तर पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्या पेक्षा जास्त असल्याने जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात असल्याने केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी आहे, इतर दुकानांवर निर्बंध आहेत.
मात्र महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारपासून सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापार सुरू करण्याचा निर्णय सांगली,मिरज आणि कुपवाड महापालिका व्यापारी महासंघाच्या वतीने घेण्यात आला आहे.
याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना दुकाने उघडणार असल्याबाबतचे निवेदन देत प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेत वेळेची मर्यादा घालून दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी,अन्यथा कोणत्याही परिस्थितीमध्ये जगण्यासाठी दुकाने उघडली जातील असा इशारा व्यापारी महासंघाचे नेते अतुल शहा यांनी दिला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.