Top 10 Headlines: पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे ५५ व्यक्तींचा मृत्यू, बदलापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, वाचा टॉप १० हेडलाइन्स

Today's Top 10 Marathi News Headlines: महाराष्ट्रासह देशातील महत्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा
top 10 headlines
Top 10 Marathi News Headlinestop 10 headlines
Published On
Latest Maharashtra News Headlines

निवडणूक आयोग लागले कामाला -

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची निवडणूक तयारी संदर्भात व्हिडिओद्वारे बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. 13 तारखेला सर्व जिल्ह्यातील आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये मतदान कर्मचारी वर्गाची निश्चितता'कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा, मतदान केंद्रांची तपासणी मतमोजणी केंद्राचा प्रस्ताव, अशा विविध बाबी तपासल्या जाणार आहेत.

तोडगा निघणार का? तुपकर यांचे शिष्टमंडळ अजित पवार यांची भेट घेणार

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणारे रविकांत तुपकर यांचे शिष्टमंडळ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे. मंत्रालयांमध्ये तुपकर शिष्टमंडळ विविध मागण्या संदर्भात चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणारे रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आंदोलन करतोय रविकांत तुपकर यांची तब्येत घालवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या भेटी नंतर प्रश्न मार्गी लागणार का?

बदलापूर अत्याचार प्रकरणात अपडेट

बदलापूर येथील त्या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कोतवाल आणि आपटे यांच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.

शाळा प्रशासनाने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अध्यक्ष कोतवाल आणि सचिव आपटे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कोतवाल आणि आपटे हे दोघेही फरार आहेत. आता अटकपूर्व जामीन फेटाळल्याने कोतवाल आणि आपटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हमालाने केला मालकाचा घात ; कांदा व्यापाऱ्यावर हल्ला

अहमदनगर:- कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करून 50 लाखाची रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 20 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. शनिवारी भरदिवसा कांदा मार्केट समोर कांदा व्यापारी समीर शेख व त्यांच्या बंधूवर अज्ञात आरोपीनी धारदार शस्त्राने हल्ला करत 50 लाखांची रोकड लंपास केली होती. पोलिसांनी cctv फुटेज तसेच तांत्रिक दृष्ट्या तपास करत 4 आरोपी राहूरी येथून तर 1 आरोपीला अहमदनगर मधून अटक केली आहे.

महायुतीची बैठक, आदित्य ठाकरेंचा पुसद दौरा रद्द

आदित्य ठाकरे यवतमाळच्या पुसद तालुक्यातील वरसद आणि कारला येथे येणार होते. ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार होते. पण आता आदित्य ठाकरेंचा हा दौरा रद्द करण्यात आलाय.

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील आडगाव ते शिवनी इथे करणार नुकसानग्रस्त भागाची पाहणी,मात्र यवतमाळच्या पुसद तालुक्यातील वडसद आणि कारला गावे दौऱ्यातून वगळण्यात आली. उद्या महत्वाची बैठक असल्याने यवतमाळच्या पुसद तालुक्यातील दौरा रद्द केल्याची माहिती,येत्या दहा दिवसात पुन्हा पुसदच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती.

एक ते दोन सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरेंचा दौरा होता.मात्र महत्वाच्या बैठकीसाठी दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती.

पश्चिम विदर्भाला अतिवृष्टीचा मोठा फटका, ५५ व्यक्तींचा मृत्यू

पश्चिम विदर्भात अमरावती,अकोला वाशीम, बुलढाणा,यवतमाळ,या पाच जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे ५५ व्यक्तींचा मृत्यू झालाय. पुरात बुडून ३९ व्यक्तीचा मृत्यू तर वीज कोसळून १० जणांचा मृत्यू,अंगावर भिंत कोसळल्याने ३ व इतर कारणांनी ३ व्यक्तींचा मृत्यू झाला. पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे तब्बल 2 लाख 52 हजार 839 हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झालेय. १ जून ते १० सप्टेंबर पर्यंत झालेल्या नुकसानीचा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अहवाल सादर करण्यात आलाय.

नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार?

नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार? असे चित्र तयार झालेय. नाशिक मध्य मतदारसंघावरून एकीकडे भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी उडाली आहे. तर दुसरीकडे नाशिक पश्चिम मतदारसंघात तिकिटावरून भाजप नेत्यांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. नाशिक पश्चिम मतदार संघात भाजपाचेच सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत.

नाशिक पश्चिम मतदार संघात उमेदवारीवरून भाजपमध्येच रस्सीखेच होतोय. भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांच्याकडून मतदारसंघावर दावा करत आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातल्या कामाच्या माध्यमातून प्रचाराचा श्री गणेशा करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाच्या माध्यमातून प्रदीप पेशकर यांची नाशिक पश्चिम मतदारसंघात आरोग्य तपासणी सुरु केली. विद्यमान आमदार सीमा हिरे, प्रदीप पेशकार, लक्ष्मण सावजी, दिनकर पाटील, शशी जाधव यांच्यासह भाजपचे अनेक जण पश्चिम मतदारसंघातून इच्छूक आहेत.

५ हजार रुपयांच्या अनुदानाची ७ लाख शेतकर्‍यांना प्रतीक्षा

परभणी जिल्हात गतवर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन कमी दराने विक्री झाल्याने शासनाकडून प्रति शेतकरी ५ हजार रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले. परंतु, घोषणा होऊनही हे अनुदान -मिळत नसल्याने जिल्ह्यातील ७ लाख शेतकऱ्यांना ५ हजार रुपये अनुदानाची प्रतीक्षा आहे. नुकसानीच्या मोबदल्यात उपाय योजना म्हणून राज्य शासनाने गतवर्षी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ५ हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यात आता बदल करुन सरसकट ही मदत मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे आधार व बँक असे संलग्न असलेली माहिती कृषी विभागाकडून गोळा केली जात आहे. मात्र पंधरा दिवसानंतरही जिल्ह्यातील ७ लाख शेतकऱ्यांना ५ हजार रुपये अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे.

सोलापूरला अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या यादीतून वगळले

सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा पिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे न झाल्याने रोष व्यक्त होतोय. सततच्या पावसामुळे उडीद,मूग पिकांच नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच अर्थकारण कोलंमडल्याचे चित्र दिसून येत आहे.

हिंगोली शहराचा दहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

हिंगोली जिल्ह्यात आलेल्या महापुरात हिंगोली पालिकेची सिद्धेश्वर धरण परिसरातील मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने शहरातील नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. मागील आठ दिवसांपासून शहरातील एक लाख तीस हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पैसे देऊन खरेदी करावं लागत आहे. दरम्यान पुरात वाहून गेलेल्या मुख्य जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हिंगोली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतले असून, पालिकेचे 50 पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी 24 तास युद्ध पातळीवर हे काम पूर्ण करण्यात व्यस्त झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com